Wedding Season : लग्नसराईत वाढणार ‘कोरोना’चा वेग, ‘या’ 8 पध्दतीनं होऊ शकतं कंट्रोल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लग्नाचा हंगाम सुरू होताच कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका वाढला आहे. हिवाळ्यात कोरोनामुळे मोठ्या आपत्तीचा इशारा तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे. विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, यासाठी राज्यस्तरीय सरकारांनी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. दिल्ली-उत्तर प्रदेशातील विवाह सोहळ्यांमध्ये 100 हून अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी नाही. दरम्यान, लग्न समारंभात खासगी काही खास खबरदारी घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो.

व्हेंटेलेशनची सुविधा : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बंद ठिकाणी विवाह सोहळ्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता जास्त आहे. अशा ठिकाणी व्हेंटेलेशनची पुरेशी सुविधा असावी. मोकळ्या जागांवर असे कार्यक्रम करणे अधिक सुरक्षित ठरेल.

उच्च कार्यक्षमता पार्टिक्युलेट एअर :

मॅरेज हॉल व्यवस्थापकांनी ‘उच्च कार्यक्षमता पार्टिक्युलेट एअर’ (एचईपीए) सुविधा प्रदान करावी. या तंत्रामुळे वायूचा 99 टक्के भाग फिल्टर करून विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कमी होतो.

कच्च्या खाण्यापासून सावधगिरी बाळगा :

कोरोना बर्‍याच तासांपर्यंत पृष्ठभागावर सक्रिय राहतो, म्हणून खाण्यापिण्यापासून सावध राहा. कोशिंबिरी, फळे, दही, कच्ची चीज किंवा कच्च्या भाज्या खाण्यास टाळा. कच्च्या अन्नाऐवजी शिजवलेले अन्नच खा. याव्यतिरिक्त, केटरर्सनीदेखील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

पृष्ठभागास स्पर्श करू नका :

कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही पृष्ठभागास स्पर्श करणे टाळा. भांड्यातून अन्न काढण्यासाठीदेखील नॅपकिन किंवा टिश्यू पेपरच्या साह्याने सर्व्हिंग चमचा धरा. खाण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.

पॅक फूड बॉक्स :

केटरिंग हा मुख्य विभाग आहे. येथे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. स्वयं-सेवा काउंटर व्यवस्थापित करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही फूड काउंटरच्या जागी पाहुण्यांना पॅक केलेला फूड बॉक्सही देऊ शकता

अतिथींची यादी :

लग्नाच्या कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांची यादी तयार करा. जे अगदी जवळ आहेत, त्यांनाच आमंत्रित करा. लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यात वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करा. असे केल्याने, आपण अधिक लोकांना कॉल करण्यास सक्षम व्हाल आणि गर्दी जमणार नाही.

सॅनिटायझर :

प्रवेशद्वार, जेवणाचे टेबल किंवा इतर ठिकाणी सॅनिटायझेशनची व्यवस्था करा. लोकांना मास्कशिवाय लग्नाच्या हॉलमध्ये जाऊ देऊ नका. सामाजिक अंतराचे अनुसरण करा आणि लोकांपासून काही अंतर ठेवा.

ही घ्या खबरदारी :

आजारी व्यक्तीला लग्नाच्या सोहळ्यात घेऊ नका. लग्नाच्या हॉलमध्ये खोकला किंवा शिंकलेल्या लोकांपासून अंतर ठेवा. शक्य असल्यास अशा ठिकाणी मुलं आणि वडीलजन घेऊ नका.

You might also like