COVID-19 : 97 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार ‘कोरोना’ व्हायरसमुळं ‘चिंतेत’ ! कविता शेअर करत म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन :ज्येष्ठ अभिनेते 97 वर्षीय दिलीप कुमार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळं ते चर्चेत आले आहेत. दिलीप कुमार यांनी एक कविता शेअर केली आहे जी कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करणारी आहे. याशिवाय इतरही मोलाचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. खूपच समर्पक शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक कविता शेअर केली आहे. यात ते लिहितात, “दवा भी, दुवा भी, औरों से फासला भी, गरीब की खिदमत, कमजोर की सेवा भी.” सोबत त्यांनी सर्वांना घरात आणि सुरक्षित राहण्यासाठी अपील केलं आहे. खूपच कमी शब्दात त्यांनी चांगल्या भावना मांडल्या आहेत आणि सर्वांना सतर्क केलं आहे. त्यांनी सर्वांना सुरक्षित रहाण्याचं तर आवाहन केलंच आहे, सोबतच गरजूंना मदत करा असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला आहे. दिलीप कुमार यांच्या या कवितेला सोशलवर मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सध्या त्यांचं ट्विट व्हायरल होताना दिसत आहे.

याआधीही बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अनेकदा अशा प्रकारे ट्विटरवरून कविता सादर केली आहे. त्यांच्याही कविता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसल्या आहेत. सध्या दिलीप कुमार यांचं ट्विट चर्चेत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like