COVID-19 : अभिनेत्री खा. हेमा मालिनींनी घेतली राज्यपालांची भेट ! फोटो शेअर केल्यानंतर होऊ लागली ‘टीका’

पोलिसनामा ऑनलाइन –भाजप नेत्या आणि उत्तर प्रदेशातील मथुरेच्या खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. कोरोनाची महाराष्ट्रातील वाढती संख्या, मुंबईत अडकलेले परप्रांतीय मजुर अशा अनेक विषयावर संवाद साधला परंतु त्यांनी सोशल डिस्टेंसिंग न ठेवल्यानं आणि मास्क न लावल्यानं आता नेटकरी अनेक सवाल करत आहे. दोघांचा एक फोटोही समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

हेमा मालिनी यांनी नुकतीच भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कोरोनापासून तर परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतराबाबत त्यांनी मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. भेटीनंतर हेमा मालिनींनी एक फोटोही क्लिक केला आणि ट्विटरवरून शेअर केला .परंतु हा फोटो समोर आल्यानंतर आता अनेक लोक त्यांना सवाल करत आहेत. कारण सामान्य माणसांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वजण मास्क वापरत आहेत आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत आहेत. अशा दोन जबाबदार नेत्यांनी लॉकडाऊनचे नियम ढाब्यावर बसवल्याचं बोललं जात आहे.

हेमा मालिनी यांनी जसा हा फोटो ट्विटरवरून शेअर केला तसा लगेच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. अनेकांनी त्यांना मास्कवरून आणि सोशल डिस्टेंसिंगवरून सवाल करत टीका केली आहे. अजूनही त्यांच्या पोस्टवर लोक कमेंट करताना दिसत आहेत.