COVID-19 : संक्रमणाच्या भीतीनं अभिनेत्री कृती खरबंदाची अवस्था झाली ‘अशी’, इंटरनॅशनल फ्लाईटनं केला होता ‘प्रवास’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन सुरू असताना सर्वजण घरातच वेळ घालवत आहेत. अ‍ॅक्ट्रेस कृती खरबंदा हीदेखील सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. परंतु एक वेळी अशी होती की, तिला वाटत होतं की, ती कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

मिड मार्चमध्ये कृती पुल्कित सम्राटच्या भावाच्या एंगेजमेंटसाठी दिल्लीला गेली होती. एका इंटरनॅशनल फ्लाईटनं ती मुंबईला आली होती. परत आल्यानंतर तिला थंडी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. तेव्हापासून कृती क्वारंटाईनमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B9o_bqxhdHw/?utm_source=ig_embed

एक मुलाखतीत बोलताना कृती म्हणाली, “माझी लक्षणं पाहून तर मला असं वाटलं की, मी कोणालाही भेटू नये. मी खूप घाबरले होते. परंतु तेव्हा देशात टेस्ट किट नव्हते. मला तापही नव्हता. त्यामुळं डॉक्टरांनी मला सेल्फ डिस्टेंसिंगचा सल्ला दिला आणि माझ्या लक्षणांवर नजर ठेवण्यासही सांगितलं. सुरुवातीचे 3 दिवस मी खूप घाबरले होते. परंतु नंतर मला ठिक वाटायला लागलं.

पुल्कित आणि कृती एकाच बिल्डींगमध्ये राहतात ज्यामुळं या पीरियडचा तिला फायदा झाला. कृतीचं म्हणणं आहे की ट्राफिकपासून बचाव करण्यासाठी आम्ही एकाच बिल्डींगमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पुल्कित आणि कृती दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत.