COVID-19 : अभिनेत्री जोया मोरानीनं सांगितला तिचा अनुभव, ‘ही’ होती लक्षणं, आता ‘अशी’ स्थिती

पोलीसनामा ऑनलाईन :चेन्नई एक्सप्रेस, राजा हिंदुस्तानी, हॅप्पी न्यू ईयर असे अनेक मोठे सिनेमे प्रोड्युस करणारे प्रोड्युसर करीम मोरानी यांना अलीकडेच कोरोना झाल्याची बामती अलीकडेच समोर आली होती. नंतर त्यांच्या दोन्ही मुलींपैकी शाजा हिला कोरोनाची लागण झाली होती. तिचे रिपोर्ट पॉझिटीव आले होते. त्यांची दुसरी मुलगी जोया हिच्यात कोरोनाची लक्षणं आढळ्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिचे रिपोर्ट मात्र निगेटीव होते. परंतु नंतर समजलं की, तिलाही लागण झाली आहे. करीम मोरानी याना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी शाजा हिलाही याच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तर जोयाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सगळ्यानंतर आता जोया मोरानीनं आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

इंस्टावरून एक पोस्ट शेअर करत जोया म्हणाली, “माझे वडिल, माझी बहिण आणि मी कोरोना पॉझिटीव आहे. माझ्या बहिणीत कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. माझ्यात मात्र काही लक्षणं आढळली होती. मी माझा अनुभव यासाठी सांगत आहे की, या व्हायरसबद्दल योग्य माहिती मिळावी आणि आपल्या त्वरीत काही गोष्टी लक्षात याव्यात. मला थोडा ताप असल्यासारखं वाटत होतं. छातीतही थोड त्रास जाणवला होता. जर रेस्ट केलं तर हे सहज झेललं जाऊ शकत होतं. प्राणायण आणि गरम पाण्यानं मला खूप मदत मिळत आहे. मी आशा करते की, मी घरी लवकर जाईन.”

पुढे बोलताना जोयानं सांगितलं, “इथं डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलमधील बाकी स्टाफ माझी योग्य काळजी घेत आहेत. त्यांची जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी पहात आहे की ते आपल्या प्रोटेक्टीव सूटमध्ये अजिबातच कंफर्टेबल नाहीत. तरीही ते सतत काम करत आहेत आणि आमच्यावर उपचार करत आहेत. ही लोकं खरे हिरो आहेत.”

View this post on Instagram

📸 @josephradhik

A post shared by Zoa💫 (@zoamorani) on

View this post on Instagram

🥽

A post shared by Zoa💫 (@zoamorani) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like