COVID-19 : ‘कोरोना’च्या 5 टेस्ट झाल्यानंतर पुढं आली गायिका कनिका कपूरला दिलासा देणारी ‘ही’ बाब

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाची लागण झालेली बॉलिवूड सिंगर कनिका कपूरची पाचवी कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटीव आली आहे. तरीही तिच्याबद्दल एक दिलासा देणारा बातमी आहे. पीजीओ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. कनिकामध्ये या आजारीचे मात्र कोणतेही लक्षण नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

कोरोची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर 20 मार्च 2020 पासून ती लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएशन इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये आयसोलेशनमध्ये आहे. सध्या तिच्यावर उपाचर सुरू असून ती डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे. अलीकडेच कनिकाची पाचवी कॉविड 19 टेस्ट करण्यात आली ज्यात कनिका पॉझिटीव आढळली आहे. हॉस्पिटलचे डायरेक्टर आर के धीमान यांच्या हवाल्यानं एएनआयनं ट्विट केलं की, “कनिका कपूर असिम्टोमॅटिक आहे. म्हणजे तिच्यात कोणतीही लक्षणं नाहीत. तिची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. ती सामान्यपणे जेवण घेत आहे. मीडियात तिची प्रकृती स्थिर नसल्याचं सांगितलं जात आहे जे चुकीचं आहे” असंही धीमान यांनी सांगितलं.

कनिकानं रविवारी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं होतं की, ती ठिक आहे. चिंता करण्यासाठी तिनं चाहत्यांचे आभारही मानले होते. कनिकानं लिहलं होतं की, “झोपायला जात आहे. सर्वांना माझं प्रेम. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहा. माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद. मी आयसीयुमध्ये नसून ठिक आहे. आशा करते माझी पुढील कोरोना टेस्ट निगेटीव येईल. कुटुंब आणि मुलांना खूप मिस करत आहे. लवकरच त्यांना भेटण्याची प्रतिक्षा आहे” असंही कनिका म्हणाली होती.