Covid and Asthma : अस्थमा रूग्णांवर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा डबल अटॅक? जाणून घ्या बचावाचे मार्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. अगोदर एखादा आजार असलेल्या लोकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. अस्थमाच्या रूग्णांना कोरोनाचा नवा स्ट्रेन कशाप्रकारे प्रभावित करत आहे आणि त्यांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे ते जाणून घेवूयात…

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना स्टडीमध्ये आढळले की, जे रुग्ण श्वासाद्वारे बुडेसोनाईड औषध घेतात, त्यांना कोरोना झाल्यास तात्काळ मेडिकल केयर किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता भासली. इतकेच नव्हे या रूग्णांच्या रिकव्हरी टाइमध्ये सुद्धा कतरता दिसून आली.

या गोष्टींची घ्या काळजी –

1  अस्थमाच्या रूग्णांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे मास्क वापरणे. कारण मास्क लावल्यानंतर त्यांचा जीव गुदमरतो. त्यामुळे अशा रूग्णांनी बाहेर जाणे टाळावे. सुती कपड्याचा मास्क वापरावा.

2  अस्थमा रुग्णांनी नेबुलायजेशन एखाद्या एकांत ठिकाणी करावे आणि दरवाजा आतून बंद करावा.

3  व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आपली सर्व माहिती डॉक्टरांना सांगा. एखाद्या इनग्रेडिएंटची अ‍ॅलर्जी असेल तर तसे सांगावे.