कॉकटेल ड्रग्जने मरणार कोरोना ? दिल्लीत वापर सुरू, नवीन रूग्णांवर 70 टक्केपर्यंत परिणामकारक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीविरूद्ध देशात सुरू असलेल्या लढाईत आता आणखी एक शस्त्र मिळाले आहे. कोरोनाला मात देण्यात उपयोगी मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग्ज (Cocktail Drugs) चा भारतात वापर सुरू झाला आहे. स्विझर्लंडची ड्रग कंपनी रोशे आणि सिप्लाने ते भारतात लाँच केले होते.

या मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलबाबत दावा आहे की, जर एखाद्या कोरोना रूग्णाला हे दिले गेले तर हे 70 टक्के परिणाम करते. याच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी होते.

Lockdown in Maharashtra : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 आठवडयानं वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय होण्याची दाट शक्यता

 

कसे काम करते हे कॉकटेल ?
’अँटीबॉडी कॉकटेल’ दोन औषधांचे मिश्रण आहे जे कोरोनाशी लढण्यात रुग्णांची शक्ती वाढवते. यामध्ये कासिरिविमाब आणि इम्देवीमाब औषधांचा समावेश आहे. ही दोन्ही औषधे 600-600 एमजी मिसळल्यानंतर ’एंटीबॉडी कॉकटेल’ औषध तयार केले जाते.

एक्सपर्टनुसार, हे औषध कोरोना व्हायरसला मानवी पेशींमध्ये जाण्यापासून रोखते, ज्यामुळे व्हायरसला न्यूट्रिशन मिळत नाही, अशाप्रकारे हे औषध व्हायरसला रेप्लिकेट करण्यापासून रोखते.

कसे दिले जाते औषध ?
अँटीबॉडी कॉकटेल एकप्रकारचा इम्युनिटी बुस्टर आहे. हे एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 48 ते 72 तासांच्या आत दिले जाते. माहितीनुसार, हे औषध देण्यासाठी 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो. औषधानंतर रुग्णाला काहीकाळ देखरेखीखाली ठेवले जाते, ज्याप्रकारे व्हॅक्सीनच्या वेळी होते.

भारतात कसे मिळणार हे औषध ?
भारतात सध्या या औषधाच्या पुरवठ्याची जबाबदारी सिप्ला कंपनीकडे आहे. हे औषध ठराविक शहरात मिळत आहे, ते सुद्धा काही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले जात आहे.

Also Read this : 

SBI घरबसल्या देत आहे या खास सुविधा, मुलांना मिळेल थेट फायदा; जाणून घ्या कसा

Corona Side Effects : रिसर्चमध्ये दावा – कोरोनातून बरे झालेल्या 14% रूग्णांना होत आहेत नवीन आजार

कोरोनाशी लढा : आज मिळणार 2-डीजी औषधाचा 10 हजार पाऊचवाला दुसरा साठा

Cocktail Drug in India : आजपासून मिळू शकते कॉकटेल ड्रग, केवळ एक डोसने होईल कोविडचा उपचार, जाणून घ्या किंमत

1 जूनपासून बदलणार हे नियम, ज्यांचा होईल तुमच्यावर परिणाम; बँक व्याजदर आणि एलपीजीच्या दरात सुद्धा होणार का बदल?