‘कोरोना’ व्हायरस रूग्णाच्या फुप्फुसांना बनवतो दगडासारखं ‘टणक’, ऑटोप्सी मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोविड -19 शी लढल्यानंतर सहा महिन्यांनी, भारतात भोपाळ नंतर गुजरात हे दुसरे केंद्र बनले आहे, तेथे कोविडमुळे मृत्यू झालेल्या मृतांचा अधिक अभ्यास केला जात आहे. या प्राणघातक विषाणूमुळे मानवी शरीराचा नाश कसा होतो हे जाणून घेण्यासाठी मृताच्या शरीरावर संशोधन केले गेले आहे आणि या प्राणघातक विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संदर्भात एक संकेत शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजकोट सिव्हिल हॉस्पिटलशी संबंधित पीडीयू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत पाच मृतदेहांचे शवविच्छेदन केले गेले आहे. यातील सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे कोरोना विषाणू माणसाच्या स्पंजयुक्त फुफ्फुसांना इतके ताठर करते – जणू ते दगडाने बनलेले आहेत असं वाटतं. यामुळे व्यक्तीला श्वास घेता येत नाही आणि त्याचा मृत्यू होतो.

पीडीयू जीएमसीचे प्राध्यापक आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख डॉ. हेतल क्यादा म्हणाले की, फॉरेन्सिक मेडिसिनच्या 13 वर्षांच्या कारकीर्दीत, विषाणूजन्य आजाराने दगडाप्रमाणे फुफ्फुसांना कठोर बनवताना त्यांनी हे प्रथमच पाहिले आहे.

डॉ. क्यादा म्हणतात, “फुफ्फुस हे स्पंजयुक्त अवयव आहे. या सामान्य उदाहरणाने समजून घेतल्यास आपण त्यांची तुलना ब्रेडशी करू शकता, जे दाबून पहिले तर ते मऊ जाणवतात. फुफ्फुसाचा कर्करोग, न्यूमोनिया आणि टीबी असलेले रुग्णांच्या शवविच्छेदनगृहात पाहिले की फुफ्फुस ताठर झालेले दिसले, परंतु कोरोनामुळे अफाट नुकसान होते. जेव्हा आपण कोविड रूग्णाच्या फुफ्फुसाचे काप करता तेव्हा असे वाटते की आपण दगड कापत आहोत. ”

डॉ. क्यादा म्हणतात की डॉक्टरांनी आणखी एक असामान्य बदल केला आहे की कोरोना विषाणूमुळे कोणतीही सूज किंवा आकारात वाढ न होता रुग्णाच्या फुफ्फुसाच्या वजनात चार पट वाढ होते. डॉ. क्यादा म्हणाले, “फुफ्फुसांचे सामान्य वजन 375 ग्रॅम ते 400 ग्रॅम दरम्यान आहे. कोरोना पीडित व्यक्तींच्या फुफ्फुसाचे वजन 1200 -1300 ग्रॅम पर्यंत होते.”

गुजरातमध्ये 19 मार्च रोजी व्हायरल इन्फेक्शनची पहिली केस दाखल झाल्यापासून कोविड-19 मध्ये 3,442 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढल्यानंतर सहा महिन्यांनंतर राज्यात कोरोनाने मरण पावलेल्या लोकांचं शवविच्छेदन करणं सुरु केलं आहे.

मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी कुटुंबाला विश्वासात घेणं हे एक मोठे आव्हान आहे. राजकोट मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की 15 कोरोना रूग्णांपैकी एकाचेच नातेवाईक पोस्टमॉर्टम करण्यास परवानगी देतात. शवविच्छेदन संक्रमणामुळे मानवी शरीराचा नाश कसा होतो यावर एक अनोखा संकेत मिळतो.