गेल्या 1 महिन्यात ‘कोरोना’च्या उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी क्लेम करणार्‍यांची संख्या 240 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड – 19 प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दररोज ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या आरोग्य दाव्यांची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा कंपन्यांची सर्वोच्च संस्था जनरल विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 71423 लोकांनी कोरोनावरील उपचारांसाठी 1145.87 कोटी रुपयांचा क्लेम केला होता. यापूर्वी 22 जूनपर्यंत केवळ 20965 लोकांनी कोरोनावरील उपचारासाठी 323 कोटी रुपयांचा क्लेम केला होता.

देशात विमा घेणारे लोक अजूनही फार कमी
देशात विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांपैकी केवळ 4.08 टक्के लोकांनी आरोग्य विम्यावर दावा केला आहे. प्रति व्यक्ती सरासरी दावा 1.60 लाख रुपये आहे. कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे देशात 37 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे आतापर्यंत फक्त 261.74 कोटी रुपयांचेच 561 डेथ क्लेम आहेत.

आयुष्मान भारत आरोग्य विमा अंतर्गत मिळाला क्लेम
आयुष्मान भारत अंतर्गत मिळणार्‍या आरोग्य विम्यात आरोग्य कव्हर सरासरी 2 लाख रुपये आहे. कोरोनाच्या बाबतीत, संपूर्ण कुटुंबालाच याचा धोका असतो, म्हणूनच आरोग्य विमा संरक्षण उपचाराचा संपूर्ण खर्च भागविण्यासाठी पुरेसे नसते. माहितीनुसार 71423 दाव्यांमध्ये आयुष्मान भारत संबंधित दाव्यांचादेखील समावेश आहे. आयुष्मान योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे कव्हर मिळते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like