Covid 19 | केंद्राने मुख्य सचिवांना पाठवला संदेश, वाढत्या प्रकरणांबाबत रहा अलर्ट; सणासुदीत Lockdown लावण्यासाठी करू नये ‘संकोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Covid 19 | देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) अद्याप पूर्ण संपलेली नाही. मात्र, प्रकरणांमध्ये काही घट नोंदली गेली आहे. परंतु, अनेक राज्यात कोरोना पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे, ज्यावर केंद्र सरकार (Central Government) पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अशावेळी आता केंद्र सरकारने कोरोना संसर्गाचा (Corona virus) प्रसार आणखी वेगाने होण्यापासून रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून सावध केले आहे. (Covid 19 | central govt wrote a letter to cs on upsurge cases do not hesitate to impose lockdown in festival season)

केंद्राने विशेषता आगामी सणांच्या (Festivals) पार्श्वभूमीवर अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सोबतच राज्यांना निर्देश दिले आहेत की, ते सणाच्या काळात कोविड-19 (Covid-19) प्रोटोकॉलचे योग्यप्रकारे पालन (Covid Protocol Appropriate Behaviour) करण्यासाठी या काळात प्रतिबंध लावू शकता.
हे सण कोरोना पसरवणारे ठरू शकतात.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज गुरूवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात मागील 24 तासात कोरोना संक्रमित नवीन रूग्णांची संख्या 43,982 नोंदली गेली आहे आणि 533 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.
यासोबतच 41,726 लोकांना डिस्चार्ज दिला आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan)
यांच्याकडून राज्यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात राज्याच्या मुख्य सचिवांना (Chief Secretaries) सणांबाबत सावध केले आहे.
सोबतच पत्राद्वारे हे सुद्धा म्हटले आहे की, गर्दी होऊ नये यासाठी राज्यांनी आपल्या स्तरावर प्रतिबंध
लावावेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना स्थानिक प्रतिबंध (Local Restrications)
लागू करणे आणि सामुहिक समारंभ रोखण्यासाठी सक्रिय प्रकारे विचार करण्यास सांगितले आहे.

 

Web Title : Covid 19 | central govt wrote a letter to cs on upsurge cases do not hesitate to impose lockdown in festival season

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amruta Fadnavis | महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? ‘या’ हटक्या शैलीत अमृता फडणवीसांचं उत्तर (व्हिडीओ)

Driving Licence | सरकारचा मोठा निर्णय ! ड्रायव्हिंग लायसन्सचे बदलले नियम, आता एनजीओ आणि खाजगी कंपन्यासुद्धा जारी करू शकतील DL

Airbags | सरकारचा नवीन प्रस्ताव ! कारमध्ये किमान 6 एयरबॅग असाव्यात, परिणाम – किंमत 30 ते 50 हजाराने वाढणार