Covid-19 : मुलेसुद्धा पसरवू शकतात प्रौढांसारखा ‘संसर्ग’, जाणून घ्या कोणत्या वयाच्या मुलांपासून जास्त ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत असे समजले जात होते की, मुलांकडून संसर्ग पसरला जात नाही, परंतु हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया विद्यापीठासह अनेक संस्थांच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, मुले सुद्धा प्रौढांएवढाच संसर्ग पसरवू शकतात. तेसुद्धा खुप जलद संक्रमित होऊ शकतात. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, जर शाळा उघडल्या गेल्या तर स्थिती भयंकर होऊ शकते.

दहा वर्षांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये जास्त धोका
संशोधकांनी दक्षिण कोरियाच्या 65 हजार लोकांवर अभ्यास करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, शाळा उघडल्यावर काय नुकसान होऊ शकते. संशोधक आणि मिनिसोटा विद्यापीठाचे महामारी रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांचे म्हणणे आहे की, जर शाळा उघडल्या तर प्रत्येक वयाची मुले संक्रमित झाल्याने नवीन क्लस्टर निर्माण होईल. असा विचार करणे धोक्याला निमंत्रण देणे आहे की, मुले अशी लोकसंख्या आहेत जी व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.

मुलांवरील सर्वात मोठे संशोधन
या संशोधनाशी संबंधित हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आशीष झा यांचे म्हणणे आहे की, हे संशोधन 65 हजाराच्या मोठ्या लोकसंख्येवर करण्यात आले. आतापर्यंत झालेले हे सर्वात मोठे संशोधन जास्त लोकांना विचारात घेऊन केले गेले आहे, यासाठी या संशोधनाची विश्वसार्हता जास्त आहे.

अगोदर काय म्हटले…
महामारीच्या सुरूवातीस युरोप आणि आशियात अनेक संशोधन करण्यात आली. ज्यामध्ये म्हटले होते की, लहान मुले संक्रमित होण्याचे आणि ते दुसर्‍यांमध्ये संसर्ग पसरवण्याची शक्यता खुप कमी आहे.

लहान मुले अर्धे संक्रमण पसरवत आहेत
संशोधनाशी संबंधित हार्वर्डच्या टीएच चान यांचे म्हणणे आहे की, दहा वर्षापर्यंतची मुले प्रौढांच्या तुलनेत अर्धे संक्रमण पसरवत आहेत. याचे कारण हे आहे की, ते तोंडाने कमी हवा बाहेर काढतात. किंवा कमी उंची असल्याने तोंडातून निघणारे संसर्गाचे कण जमीनीच्या जवळच राहतात, ज्यामुळे हे कण प्रौढांपर्यंत पोहचणार्‍या हवेत मिसळत नाही.

ज्येष्ठांमध्ये क्लिनिक संसर्गाचा धोका जास्त
नेचर मेडिसिनमध्ये छापलेल्या संशोधनानुसार, 69 पासून जास्त वयाच्या लोकांमध्ये क्लिनिकल संसर्गाचा धोका 69 टक्केपासून 82 टक्के असू शकतो. म्हणजे ज्येष्ठांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसतात आणि त्यांना 69 टक्के प्रकरणात त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासते. हे संशोधन चीन, इटली, जपान, सिंगापुर, दक्षिण कोरियामधील संसर्गाच्या डाटावर आधारीत गणितीय मॉडलवरून करण्यात आले.

आता जास्त युवक संक्रमित होत आहेत
महामारीच्या सुरूवातीस जास्त वयाच्या लोकांमध्ये संसर्ग जास्त आढळून आला होता, तर आता मागील दोन महिन्यापासून युवकांची संसर्गाची प्रकरणे जगभरात वाढत आहेत. अमेरिकेत अर्थव्यवस्था उघडल्यानंतर एरिजोना, टेक्सास, ओक्लाहोमा, मिसौरी राज्यात जास्त युवक पॉझिटिव्ह आढळले.

क्लिवलँड क्लिनिक्सचे डॉ. फँक एस्पर यांचे म्हणणे आहे की, सुरूवातीस सिमित साधनांमुळे विशेष वयाच्या लोकांमध्ये तपासणी होत होती, यासाठी तरूणांमध्ये कमी प्रकरणे समोर येत होती. सोबतच त्यांचे म्हणणे आहे की, जर तरूणांमध्ये हलकी लक्षणे जरी असली, तरी सुद्धा त्यांनी बचावाच्या साधनांचा सक्तीने वापर न केल्याने ते जास्त संख्येने ज्येष्ठ, मुले आणि दिव्यांगांपर्यंत संसर्ग पोहचवतात.

पुन्हा शाळा उघडल्या तर वाढेल धोका
191 देशांमध्ये व्हायरसमुळे जारी शाळाबंदीमुळे 150 कोटी मुले आणि 6.3 कोटी शिक्षक प्रभावित झाले आहेत. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, लहान मुलांकडून कमी संसर्ग पसरत असला तरी पुन्हा शाळा उघडल्यास त्यांचा जीव धोक्यात असेल. एवढेच नाही, यामध्ये सामुदायिक स्तरावर सुद्धा संसर्ग भयावह होईल.

पुन्हा शाळा उघडण्यात हे देश अयशस्वी
दक्षिण कोरिया : कमी संसर्ग आणि उत्तम ट्रेसिंगच्या नंतरसुद्धा येथे एका शाळेत दोन मुले पॉझिटिव्ह आढळली. ज्यानंतर सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची तपासणी करावी लागली.

चीन : येथे मे महिन्याच्या अखेरीस बिजिंगसह त्या शहरात शाळा उघडल्या जेथे संसर्ग अगदी कमी होतो, परंतु यामुळे संसर्ग पुन्हा वाढला आणि शाळा बंद कराव्या लागल्या.

इस्त्रायल : एक हजारपेक्षा जास्त मुले आणि शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर सरकारला जूनमध्ये पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या.

हाँगकाँग : येथे दुसरी लाट थांबल्यानंतर 13 जूनपासून शाळा उघडल्या गेल्या, पण तिसर्‍या लाटेची शंका आल्याने 5 जुलैपासून शाळा बंद करण्यात आल्या.

अमेरिका : अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक वर्षापर्यंतच्या 85 बालकांमध्ये व्हायरसची लक्षणे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, सरकार अजूनही शाळा उघडण्याच्या आडमुठे धोरणावर अडून बसले आहे.

फिनलँड आणि डेन्मार्कचा आदर्श
जगात सर्वात उत्तम शिक्षण देणार्‍या या देशाने टप्प्याटप्प्याने शाळा उघडल्या. फिनलँडच्या केंद्र सरकारने गाईडलाइन बनवली आणि याच्या आधारावर नगरपालिका आणि शाळांना आपली योजना तयार करण्यास सांगितले. येथे वर्गात प्रत्येक मुलाच्या टेबलदरम्यान 6.5 फुटाचे अंतर ठेवले जात आहे, प्रत्येक दोन तासांनी हात धुणे अनिवार्य आहे. कमी विषय शिकवले जात आहेत आणि जास्त सिंक आणि बाथरूम बनवले गेले आहेत, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी व्हावा. पालकांवर मुलांना शाळेत पोहचवण्याची जबाबदारी दिली आहे.

लक्षणे नसलेली मुले बनतील आव्हान
संशोधनाशी संबंधित जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या तज्ज्ञ कॅटलिन रिव्हर्स यांचे म्हणणे आहे की, जर मुलांमध्ये संसर्ग पसरला तर मोठे आव्हान असिम्प्टोमॅटिक मुले निर्माण करतील. अशा मुलांकडून पसरवल्या जाणार्‍या संसर्गाचा तपास लावणे खुप अवघड आहे.