Covid-19 : पुण्यात आता नागरिकांसाठी ‘आचारसंहिता’ ?, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिका आता कोरोनाला रोखण्याासाठी नव्या उपाय योजना करणार आहे. पुण्यातही आता मुंबई प्रमाणे आचारसंहिता लागू करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होऊ शकते आहे. कोरोनाचा प्रसार वेगानं होत असल्यानं महापालिका नवे नियम लागू करण्याची शक्यता आहे. जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंड करण्यात येण्याचीही शक्यता आहे.

या नियमांमध्ये 2 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभं राहता येणार नाही. यापूर्वी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा विनाकारण रस्त्यावर फिरता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टेंन्सिंगचं पालनही सक्तीचं करण्यात येणार आहे.

जे दुकानदार सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करत नाहीत त्यांच्याविरोधात कारवाईलाही महापाालिकेनं सुरुवात केली आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध महापालिकेनं कारवाई केली आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात सध्यातरी नागरिकांसाठी आचारसंहिता लागू नसल्याचे म्हंटले आहे पण सर्वांनी मास्क वापरावे आणि इतर नियम पाळावे असे आवाहन केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like