Coronavirus : व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये कोरोना होईल आणखी धोकादायक? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले ‘सत्य’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अलिकडेच फ्रान्सचे वायरॉलॉजिस्ट आणि नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टॅग्नियर यांनी कोरोना (Coronavirus ) ची व्हॅक्सीन आणि व्हेरिएंटबाबत एक वक्तव्य केले होते जे खुप चर्चेत आहे. ल्यूक यांनी दावा केला होता की, व्हॅक्सीनने तयार झालेली अँटीबॉडी कोरोनाच्या नव-नवीन व्हेरिएंटला जन्म देईल आणि यामुळे महामारी आणखी धोकादायक रूप धारण करेल. मात्र, ल्यूक यांचा दावा तमाम डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांनी फेटाळला आहे. भारताच्या प्रसिद्ध व्हॅक्सीन शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी सुद्धा ल्यूक यांचा हा दावा निराधार असल्याचे म्हटले.

गगनदीप यांनी म्हटले की, कोविड-19 चे व्हेरिएंट कमी करण्याचा एकमात्र उपाय व्हॅक्सीनेशन वाढवणे आहे. मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशनला चुकीचे म्हणूने वैज्ञानिकदृष्ट्या तथ्यहीन आहे. कांग यांनी म्हटले की, ल्यूक यांनी हे म्हटले नाही की, व्हॅक्सीन घेतलेले सर्व लोक दोन वर्षात मरतील, जसे की काही लोक दावा करत आहेत. त्यांनी म्हटले होते की, व्हॅक्सीनद्वारे तयार अँटीबॉडी व्हायरसचे नवीन व्हेरिएंट्स बनवते.

डॉक्टर कांग यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, ल्यूक यांनी म्हटले की, व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये अँटीबॉडी डिपेंडंट एन्हँसमेंटच्या कारणामुळे व्हेरिएंटने संसर्ग आणखी मजबूत होईल, मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशन करणे एक मोठी चुक आहे, एक वैद्यकीय चूक आहे. कांग यांनी ट्विट करून म्हटले की, त्यांचा हा दावा योग्य नाही.

डॉक्टर कांग यांनी म्हटले, जेव्हा आपण संक्रमित होतो किंवा जेव्हा व्हॅक्सीन घेतो तेव्हा आपल्या शरीरात संपूर्ण व्हायरस किंवा व्हायरसच्या भागाला उत्तर देण्यासाठी अँटीबॉडी तयार होते. वायरल संसर्गात, शरीराचे अँटीबॉडीसह इम्यून रिस्पॉन्स वायरलची प्रतिकृती (रेप्लिकेशन) बनवण्यापासून रोखते आणि आपण संसर्गातून बरे होतो.

इम्यून सिस्टमला देते ट्रेनिंग –
व्हॅक्सीनेशनला ’तयारी आणि प्रतिबंध’ म्हणत डॉक्टर कांग यांनी म्हटले की, आपली इम्यून रिस्पॉन्स व्हायरसची ताबडतोब लढण्यास सुरूवात करत नाही, तर ती इम्यून सिस्टमला व्हायरसला ओळखण्याचे ट्रेनिंग देते. खुप कमी लोक इम्यूनोकॉम्प्रोमाईज्ड (कमजोर इम्यूनिटी) असतात. शक्यता आहे की, या लोकांमध्ये व्हायरस प्रतिकृती मोठ्या कालावधीपर्यंत राहू शकते. अशा दुर्मिळ प्रकरणात व्हेरिएंटचा विकास होऊ शकतो कारण ते इम्यून रिस्पॉन्सपासून वाचतात.

डॉ. कांग यांनी म्हटले व्हेरिएंट्स अनेक आहेत, परंतु इम्यूनिटीपासून वाचणारे व्हेरिएंट कमी आहेत. जसे की व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो. काही व्हेरिएंट व्हॅक्सीनने तयार इम्यूनिटीपासून वाचण्यात जास्त सक्षम आतात. ते व्हॅक्सीनच्या प्रभावाला काही प्रमाणात कमी करतात. कदाचित आपण वर्तमानात बी1.351 आणि बी1.617.2 च्या सोबत असेच पहात आहोत. मात्र, कतर आणि युकेच्या डेटानुसार व्हॅक्सीनचे दोन डोस जास्त सुरक्षा देतात.

Also Read This : 

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

 

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

 

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

 

केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !