COVID-19 : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता क्रिस्तोफर हिव्जूनं जिंकली ‘कोरोना’ची लढाई ! शेअर केल्या ‘भावना’

पोलिसनामा ऑनलाइन –हॉलिवूड स्टार आणि फेमस टीव्ही सीरिज गेम ऑफ थ्रोन्समध्ये टोरमंडची भूमिका साकारणारा अभिनेता क्रिस्तोफर हिव्जू याला काही दिवसांपर्वी कोरोनाची लागण झाली होती. क्रिस्तोफरनं आता ही कोरोनाची लढाई जिंकली आहे. सोशल मीडियावरून क्रिस्तोफरनं याबाबत माहिती दिली आहे. या बातमीनंतर त्याचे चाहतेही खूप खुश दिसत आहेत.

क्रिस्तोफरनं त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यानं त्याच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली आहे. क्रिस्तोफर म्हणतो, “कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आम्ही पुर्णपणे बरे झालो आहोत. अनेक आठवडे क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आता कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. आम्ही लकी आहोत की, आमच्यात कोरोनाची काही क्षुल्लक लक्षणं होती.” क्रिस्तोफरनं त्याच्या या पोस्टमधून जगभरातील सर्व रुग्ण लवकर बरे होवोत अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

क्रिस्तोफर पुढे म्हणतो, “तुमच्या सर्वांच्या या प्रेमाबद्दल धन्यवाद. कृपया दक्ष रहा. आपलं अंतर कायम ठेवा. आपले हात धुवत रहा. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, या कठिण काळात एकमेकांची काळजी घ्या.”

क्रिस्तोफरनं कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या इंस्टावरून याबाबत माहिती दिली होती. फॅमिलीसोबतचा फोटो शेअर करत क्रिस्तोफरनं एक लांबलचक पोस्ट लिहली होती.