खुशखबर ! तयार झाली ‘कोरोना’ची लस, वाढवतेय ‘व्हायरस’शी लढण्याची ‘ताकत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी जगभरात रिसर्च चालू असून वेगवेगळे देश दावा करत आहे कि त्यांच्या इथे लस बनत आहे. यादरम्यान अमेरिकन शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्या लसीने ताकदीची पातळी गाठली आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ या आजारावर औषध शोधत आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४७ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून १० लाख लोकं या आजाराने संक्रमित आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांना चिंता आहे कि ते लवकरात लवकर लस बनवतील.

युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कुल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, इतर देशांच्या तुलनेत त्यांनी खूप लवकर कोविड-१९ ची लस विकसित केली आहे. या युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी जी लस बनवली आहे ती त्यांनी सार्स आणि मर्सच्या रुग्णांसाठी बनवली होती. पिट्सबर्ग स्कुल ऑफ मेडिसिनच्या असोसिएट प्रोफेसर आंद्रिया गमबोट्टो यांनी सांगितले की, हे दोन्ही सार्स आणि मर्सचे व्हायरस नवीन कोरोना व्हायरससारखेच होते. यातून आम्हाला हे शिकायला मिळाले की, या तिन्हीच्या स्पाइक प्रोटीनला छेदने आवश्यक आहे जेणेकरून लोकांना या व्हायरसपासून सुटका मिळेल.

गमबोट्टो म्हणाल्या की, आम्ही हे जाणून घेतले आहे कि या व्हायरसला कसे मारायचे आहे. त्याला कसे हरवायचे आहे. आम्ही या लसीचे परीक्षण उंदरावर केले असून याचा परिणाम एकदम पॉजिटीव्ह होता. प्रो. गमबोट्टो यांनी सांगितले की, या लसीचे नाव पहिले पिटगोवाक (PittGoVacc) ठेवले आहे. या लसीच्या परिणामामुळे उंदराच्या शरीरात असे अँटीबॉडीज निर्माण होतात जे कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी आहेत.

तसेच ते म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जितक्या अँटीबॉडीजची गरज शरीराला आहे, ती गरज पिटगोवाक लस पूर्ण करत आहे. आम्ही लवकरच याचे परीक्षण माणसांवर सुरु करणार आहोत. ही टीम पुढचे काही महिने या लसीचे माणसांवरील ट्रायल सुरु करेल. ही लस इंजेक्शन सारखी नाहीये. ही एक चौरस पॅचसारखी आहे, जी शरीराच्या कोणत्याही भागावर चिटकवली जाते.

या पॅचमध्ये ४०० पेक्षा जास्त छोट्या-छोट्या सुया आहेत ज्या साखरेपासून बनवलेल्या आहेत. या पॅचद्वारे त्यात असलेले औषध शरीरात पोचवले जाते. लस देण्याची पद्धत एकदम नवीन आणि प्रभावी आहे. यांच्या टीमने हे स्पष्ट केले नाही की, या अँटीबॉडीजचा परिणाम किती वेळ उंदराच्या शरीरात राहिला होता. पण टीमने म्हटले की, आम्ही मागच्या वर्षी मर्स व्हायरससाठी लस बनवली होती जी खूप यशस्वी झाली होती.