Corona Virus : ‘कोरोना’पासून कोणताच ‘धडा’ नाही घेतला चीननं, जिवंत कुत्र्याला ‘भाजून’ खाणं अद्यापही सुरूच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत जगात ४५,१७१ लोकांना कोविड १९ (Covid 19) कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तर १,११५ लोक मरण पावले आहेत. फक्त चीनमध्येच जवळपास ४४,६५३ लोक आजारी आहेत. तर १,११३ लोक मरण पावले आहेत. पण चीनमधील लोक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. आता जगातील विविध माध्यमांमध्ये एक बातमी आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जो अत्यंत भयानक आहे. चीन मधील एका बाजारात कुत्र्यांना जिवंत उकडले जात आहे. जिवंत भाजले जात आहे, कारण ते त्यांचे मांस खाऊ शकतील.

हे व्हिडिओ आणि फोटो चीनच्या गुआंग्सी प्रांतातील यूलिन शहरातून आले आहेत. युलिनमध्ये सध्या कुत्र्यांचे मांस विकण्याची बाजारपेठ आहे. येथे कुत्र्यांना उकडले जात आहे. त्यांना जिवंत भाजले जात आहे आणि लोकांसमोर खायला देऊ केले जात आहे.

यूलिनच्या या बाजारपेठेतून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि वेदनेने ओरडत असण्याचा आवाज येत आहे. काही लोक बाजारातून छोटी कुत्री विकत घेऊन त्यांना घरी घेऊन जात आहेत. जेणेकरून त्यांना शिजवून खाता येईल.

यासाठी लंडनमध्ये नो टू डॉग मीट (No to Dog Meat) अभियान राबवले जात आहे. या मोहिमेतील लोक आता लंडनमधील चिनी दूतावासासमोर आंदोलन करणार आहेत. जेणेकरुन चीनने कुत्री खाण्याबाबत कठोर नियम तयार केले पाहिजेत. जेणेकरून कुत्री मारणे थांबू शकेल.

यूलिन मध्ये दरवर्षी जून महिन्यात कुत्र्यांचे मांस विकण्याचे एक फेस्टिवल होत असते. परंतु यावेळी हा व्हिडीओ लवकरच आला कारण बाजार तर नेहमीच चालू असतो.

यूलिनच्या या बाजारात कुत्र्यांना अशा लहान पिंजऱ्यात ठेवण्यात येते. तसेच त्यांना अशा पद्धतीने कोंबून ठेवले जाते की त्यांना श्वास घेणेदेखील अवघड होते. त्यांचे पाय आणि शेपूट इकडे तिकडे अडकलेल्या अवस्थेत असतात. चीनमधील २० टक्के लोक अद्याप दररोज कुत्र्याचे मांस खात असतात.

यूलिनमध्ये कुत्र्यांची विक्री होण्याअगोदर एका अंधाऱ्या ठिकाणी बंद करून ठेवले जाते. त्यांना कमी अन्न दिले जाते. या परिस्थितीत कुत्री प्रचंड घाबरतात. जेव्हा त्यांना यूलीनच्या बाजारात आणले जाते तेव्हा ते जोरजोराने ओरडतात, भुंकतात पण शेवटी त्यांना मारले जाते.