Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री मुक्ता बर्वेनं शेअर केली खास ‘कविता’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खतरनाक अशा कोरोना व्हायरसनं देशातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरात शिरकाव केला आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर अशी ठिकाणं आहेत जिथून काही कोरोनाग्रस्त समोर आले आहेत. दिवसेंदिवस देशातील आणि राज्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच , ही पीडा कधी जाईल असं सर्वांना वाटत आहे. यासाठी सर्व लोक सरकारच्या प्रत्येक निर्णयाला सपोर्ट करत आहेत. सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या पोस्टमुळं चर्चेत आली आहे.

कोरोनाच्या जनजागृतीसाठी प्रत्येकजण जमेल तसा प्रयत्न करत आहे. मुक्ता बर्वेनं एक कविता शेअर केली आहे. मुक्तानं कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या आहेत. सध्या तिच्या कवितेची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे.

मुक्तानं तिच्या इंस्टावरून कविता शेअर केली आहे. सोबत तिनं एक फोटोही शेअर केला आहे. फोटोत एक नारळ दिसत आहे ज्याला मास्क लावला आहे. शेजारी एक सॅनिटायजरची लहान बाटली आहे. एक वहिचं पान आहे ज्यावर तिनं आपल्या भावना मांडल्या आहेत.

इडा पीडा अडसर दूर होऊ दे
आगीवर पावसाचे थेंब पडू दे
रात इथं थबकावी
दिवसाला जाग यावी
उद्याच्या प्रकाशाची आज गाज मिळू दे

असं काहीसं मुक्तानं आपल्या कवितेत सुरूवातीला आणि शेवटी म्हटलं आहे. तिला सांगायचं आहे की, हे कोरोनाचं संकट लवकरच दूर होऊ दे.