COVID-19 : शास्त्रज्ञांनी सांगितले, एकदा संक्रमित झालेली व्यक्ती पुन्हा कधी होऊ शकते संक्रमित

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोविड-19 ( COVID-19 ) महामारीसाठी जबाबदार सार्स-सीओव्ही-2 व्हायरसने पहिल्यांदा संक्रमित झाल्यानंतर पुढील 10 महिन्यांपर्यंत या आजाराने पुन्हा कोविड-19 ( COVID-19 ) संक्रमित होण्याचा धोका खुप कमी होतो. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

जर्नल लान्सेट हेल्दी लाँगेव्हिटीमध्ये प्रकाशित एका संशोधनात मागील वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी फेब्रुवारीदरम्यान इंग्लंडमध्ये केयर होममध्ये राहणार्‍या 2000 पेक्षा जास्त लोकांवर आणि कर्मचार्‍यांवर कोविड-19 संसर्गाचा दर पाहिला गेला.

ब्रिटन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांनी अँटीबॉडी चाचणीद्वारे 10 महिन्यांपूर्वी संसर्ग झालेल्या लोकांची तुलना त्या लोकांशी केली.
ज्यांना अगोदर कोविड संसर्ग झाला नव्हता.

संशोधनात आढळले की, जे लोक अगोदर संक्रमित झाले होते.
ते या चार महिन्याच्या कालावधीत पुन्हा संक्रमित होण्याची जोखीम त्या लोकांच्या तुलनेत 85 टक्केपर्यंत कमी होती जे आतापर्यंत या संसर्गापासून वाचले होते.
केयर होमचे कर्मचारी जे अगोदर संक्रमित झाले होते.
त्यांच्या अगोदर संक्रमित न झालेल्या लोकांच्या तुलनेत संक्रमित होण्याची जोखीम 60 टक्के कमी होती.

संशोधकांनी सांगितले की, हे दोन्ही गटात मजबूत सुरक्षा दर्शवते परंतु इशारा दिला की या दोन्ही प्रकरणांची प्रत्यक्ष तुलना केली जात नाही.
त्यांनी म्हटले की, असे यासाठी आहे कारण कर्मचार्‍यांनी देखभाल केंद्रांच्या बाहेर चाचणीचा वापर केलेला असू शकतो, ज्यामुळे सकारात्मक चाचण्यांचा संशोधनात समावेश केला जाऊ शकत नाही.

यूसीएलचे इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्समध्ये संशोधनाच्या मुख्य लेखिका मारिया क्रुतिकोव्ह यांनी म्हटले, ही खरंच चांगली बातमी आहे की,
नैसर्गिक संसर्ग या कालावधीत पुन्हा संक्रमित होण्याच्या विरूद्ध सुरक्षा प्रदान करतो.
दोन वेळा संक्रमित होण्याचा धोका अतिशय कमी दिसून येतो.

क्रुतिकोव्ह यांनी म्हटले, केयर होमच्या रहिवाशांत एकदा कोविडने संक्रमित झाल्यानंतर मिळणारी उच्च स्तरीय प्रतिकारशक्ती आश्वस्त करणारी आहे.

READ ALSO THIS :

त्वचा, केसांच्या समस्या सोडवेल ‘विलायची’, जाणून घ्या फायदे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, रुग्णांची लूट थांबणार

Pune : पुण्याच्या सदाशिव पेठेतील बिल्डरला 30 लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाने धमकावले, शशिकांत गोलांडे अन् निलेश देशपांडेविरूध्द FIR

जामीनावर आला होता बाहेर, पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता PM मोदींना दिली जीवे मारण्याची धमकी

‘…तर तुमचं WhatsApp अकाऊंट बंद होईल’; जाणून घ्या

Sanjay Raut : ‘उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने खेडमध्ये आलोय, अजितदादा तुमच्या आमदारांना वेसण घाला’