COVID 19 : क्रिकेटर मिताली राजनं डोनेट केले 10 लाख ! म्हणाली- ‘अवघड काळात एकत्र येऊयात’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना या महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारताची महिला स्टार क्रिकेटर मिताली राज हिनं मदतीचा हात दिला आहे. मितालीनं 10 लाख रुपये डोनेशन देण्याची घोषणा केली आहे. मितालीनं पंतप्रधान मदतनिधीत 5 लाख आणि मुख्यमंत्री मदतनिधीत 5 लाख असे 10 लाख देऊ केले आहेत. तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीत मितालीनं ही रक्कम देऊ केली आहे.

याआधीही क्रिडा क्षेत्रातून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं पंतप्रधान मदतनिधीत पैसे डोनेट केले आहेत. ट्विट करत त्यांनं सांगितलं होतं अनुष्कासोबत मिळून त्यानं डोनेशन दिलं आहे. रक्कम किती आहे याचा खुलास मात्र विराटनं केला नव्हता. सचिन तेंडुलकरनंही डोनेशन दिलं आहे. त्यानं तब्बल 50 लाखांची मदत केली आहे.

मितालीच्या आधी महिला बॉक्सर मेरी कोम हिनं 1 लाख रुपये, पीव्ही सिंधू हिनं 10 लाख रुपये दान केले आहेत. कोरोनानं अख्ख्या जगात थैमान घातलं आहे. जगभरातील बाधितांची संख्या 7 लाखांहून अधिक आहे. तर 30 हजारांहून अधिक लोक या महामारीमुळं दगावले आहेत.

भारताबद्दल बोलायचं झालं तर बाधितांचा आकडा 1000 हून अधिक झाला आहे तर 29 लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात कोरोनामुळं 21 दिवस लॉकडाऊन आहे. 24 मार्च 2020 रोजी घोषित केलेला हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे.