‘लॉकडाऊन’ दरम्यान दररोज सरासरी 301 ‘कोरोना’चे नवीन प्रकरणे, 25 मार्चपासून ‘अशी’ झाली वाढ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी रात्री 8 वाजता देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. पुढील तीन आठवडे म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी-खासगी कार्यालये, व्यवसाय बंद करण्यात आली. देशात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. हा पंतप्रधानांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. कारण सामाजिक अंतरामुळेच कोरोनाला रोखता येऊ शकते.

दरम्यान, रोजंदारी करणाऱ्या कामगारांचे स्थलांतर हे चित्र समोर आल्यानंतर, टाळी-थाली आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांसारख्या उपक्रमांमधून देशाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊन संपण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे, असे असताना लॉकडाऊन किती प्रभावी होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी किती जणांना संसर्ग झाला आणि आजची स्थिती काय आहे ? दररोज सरासरी किती रुग्ण वाढतात हे खालील तक्त्यावरून दिसून येते.

chart