नवी दिल्ली : भारतात कोविडच्या दुसर्या लाटेनंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची (covid 19 delta plus variant) चाहूल लागली आहे. देशात कोरोनाच्या या नवीन रूपाची प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत. यापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासह डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत (covid 19 delta plus variant) जाणून घेणे खुप आवश्यक आहे. डेल्टा व्हेरिएंट काय आहे, त्याची लक्षणे आणि यापासून बचाव कसा केला जाऊ शकतो? ते जाणून घेऊयात…
डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट ज्यास बी.617.2 म्हटले जाते, तो म्यूटेंट होऊन डेल्टा प्लस किंवा AY.1 मध्ये रूपांतरीत झाला. हा केवळ भारतात नव्हे तर जगातील अनेक देशांत आढळला आहे, ज्यामुळे मेडिकल एक्सपर्टची चिंता वाढत आहे.
Aurangabad Municipal Corporation | औरंगाबाद महानगरपालिकेत भरती, सव्वा लाखाचा पगार, जाणून घ्या
डेल्टा व्हेरिएंटच्या स्पाईकमध्ये K417N म्यूटेशनचा समावेश झाल्याने डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला आहे. हाच K417N X. अफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या बीटा व्हेरिएंट आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या गामा व्हेरिएंटमध्ये सुद्धा सापडला आहे. शास्त्रज्ञ जीनोम सीक्वेन्सिंगद्वारे सातत्याने लक्ष ठेवून आहेत. याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येऊ शकते.
याशिवाय K41N नावाचे म्यूटेशन जे दक्षिण अफ्रिकेत बीटा व्हेरिएंटमध्ये आढळले होते त्याच्याशी सुद्धा याची लक्षणे जुळतात. यासाठी हा जास्त धोकादायक मानला जात आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटची 40 प्रकरणे समोर आली आहेत.
covid 19 delta plus variant know syptoms and ways of prevention
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकमध्ये 40 प्रकरणे सापडली आहेत. WHO ने डेल्टा व्हेरिएंटला ’व्हायरस ऑफ कन्सर्न’ म्हटले आहे.
Gold Rate Today । सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर
डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे
आरोग्य मंत्रालयानुसार, डेल्टा प्लस जास्त संसर्ग आहे आणि फुफ्फुसाच्या पेशींना रिसेप्टरने मजबूतीने चिकटण्यात सक्षम आहे. ज्याच्या कारणामुळे लवकर नुकसान करण्याची शक्यता असते. हा इम्यूनिटीला फसवण्यात सक्षम आहे.
ज्या लोकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे, त्यांना गंभीर खोकला आणि, सर्दीची लक्षणे मागील व्हायरसपेक्षा खुप वेगळी दिसून आली. अभ्यासानुसार, डोकेदुखी, घशात खवखव आणि नाक वाहणे डेल्टा प्लस व्हेरिएंटशी संबंधीत सामान्य लक्षणे आहेत.
डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून असा करा बचाव
– घरातून आवश्यकता असेल तरच बाहेर पडा.
– जेव्हा सुद्धा घरातून बाहेर पडाल, विशेषता डबल मास्क घाला.
– हात दिवसातून अनेकदा 20 सेकंदसाठी धुवा.
– लोकांपासून शारीरीक अंतर म्हणजे 6 फुटाचे अंतर राखा.
– घर आणि आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवा आणि डिसइन्फेक्ट करा.
– बाहेरून आणलेले प्रत्येक सामान डिसइन्फेक्ट करा.
Rohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’