Covid- 19 : डायबिटीज रूग्णांसाठी धोकादायक कोरोना, ‘या’ 5 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा विध्वंस सुरू आहे. या दरम्यान आलेली दुसरी लाट सर्व वयोगटातील लोकांना धोकादायक ठरत आहे. रिपोर्टनुसार, ज्या लोकांना डायबिटीजची समस्या आहे त्यांनी कोरोना व्हायरसपासून जास्त सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. अशावेळी डायबिटीजच्या रूग्णांमध्ये कोरोनासह मोर्टेलिटी रेटसुद्धा जास्त होत आहे. यावरून म्हटले जाऊ शकते की, कोरोना व्हायरस डायबिटीजच्या रूग्णांसाठी जास्त धोकादायक आहे.

डायबिटीज एक असा आजार आहे ज्यामध्ये इन्सुलिनच्या उत्पादनात घट होते. डायबिटीजमध्ये ब्लडमध्ये शुगरची लेव्हल हाय होते आणि शरीराची इम्युनिटी कमजोर होते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. यामुळे डायबिटीजच्या रूग्णांना कोरोना व्हायरसशी लढण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत लोकांमध्ये अनेक असामान्य लक्षणे दिसून येत आहेत. त्वचेवर चट्टे, सूज आणि अ‍ॅलर्जी इत्यादी. अशावेळी कोरोना व्हायरसची बहुतांश लक्षणे जसेकी बोटांवर चट्टे, खाज सुटणे, त्वचेवर लाल चट्टे किंवा डाग इत्यादी डायबिटीजच्या रूग्णांना जाणवू शकते. डायबिटीजमध्ये ब्लडमध्ये शुगरची लेव्हल हाय झाल्यास त्वचा कोरडी होते. यामुळे शरीरावर सूज, लाल डाग, खाज, चट्टे, फोड इत्यादी येतात. ही सर्व कोविड संसर्गाच्या लक्षणांपैकी एक आहेत. यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी त्वचेची अतिशय काळजी घेतली पाहिजे.

निमोनिया जेवढा कोविड रुग्णांसाठी गंभीर ठरू शकतो तेवढाच डायबिटीजच्या रूग्णांसाठी सुद्धा घातक ठरू शकतो. शरीरात सूज वाढणे आणि अनियंत्रित ब्लड शुगर लेव्हलने रेस्पिटरी हेल्थवर खुप प्रभाव पडतो. यामुळे शरीराचे नुकसान होते.

कोविड- 19 च्या रूग्णांमध्ये ऑक्सीजन लेव्हलची घसरण सर्वात मोठ्या गुंतागुंतीपैकी एक आहे. अनेक अभ्यासात दिसून आले आहे की, डायबिटीजचे रूग्ण किंवा कमजोर इम्युनिटीवाल्या रूग्णांमध्ये ऑक्सीजनची कमतरता आणि श्वास लागणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, हृदयाशी संबंधीत आजार इत्यादी लक्षणांनी पीडित होण्याची शक्यता जास्त असते. हायपोक्सिया अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोणत्याही लक्षणांशिवाय शरीरात ऑक्सीजन लेव्हल अचानक कमी होते. सामान्यपणे ही स्थिती डायबिटीज रूग्णांमध्ये जास्त दिसून येते.