‘कोरोना’ हल्ल्यापुर्वी ‘चेहरा’, ‘धर्म’, ‘रंग’, ‘जात’ नाही बघत, एकजुटता राखा : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस हल्ला करण्यापुर्वी चेहरा, धर्म, रंग, जात, भाषा आणि सीमा पहात नाही. त्यामुळं आपल्या सर्वांचे प्रयत्न आणि व्यवहार एकजुटतेचे असायला हवेत असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरव्दारे केले आहे.

कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत या महामारीमुळं 507 जणांचा बळी गेला आहे. आरेाग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात 3 लाख 86 हजार 791 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’ व्हायरसचे 1384 नवीन रूग्ण, 27 जणांचा मृत्यू

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि इतर सरकारी विभाग देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणावर नजर ठेवुन आहेत. रविवारी आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि आयसीएमआरनं संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लॉकडाऊनचं कडक पालन करण्याबाबत गृह मंत्रालयानं सांगितलं. परिस्थिती आढावा घेतल्यानंतरच सूट देण्याबाबत पावले उचलली जातील असं सांगण्यात आलं आहे. 23 राज्यामधील 54 जिल्हयांमध्ये गेल्या 14 दिवसांपासुन कोरोना व्हायरसचा एकही रूग्ण आढळून आला नसल्याचं सांगितलं.

देशात आतापर्यंत कोरोनाचे एकुण 15 हजार 712 प्रकरण समोर आली असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1384 नवीन प्रकरण समोर आली आहेत तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 507 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तब्बल 2281 रूग्ण बरे झाले आहेत. 20 एप्रिल नंतर कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट दिली जाणार नाही. लॉकडाऊनचं कडक पालन करण्यात येईल.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 लाख 86 हजार 791 चाचण्या केल्याचं आयसीएमआर सांगितलं. शनिवारी 38 हजार 173 चाचण्या झाल्या असून त्यामधील 29 हजार 287 चाचण्या या आयसीएमआरच्या लॅबमध्ये केल्या आहेत तर 7886 चाचण्या खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या उपचारासाठी आतापर्यंत 755 हॉस्पीटल तयार झाले आहेत. तसेच 1389 आरोग्य केंद्र देखील बनविण्यात आले आहेत.