COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळे Corona Virus मागील अनेक महिन्यांपासून लागलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधीत समस्या मायोपियाची myopia प्रकरणे दिसून आली आहेत, विशेषता मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसून आली आहे. (COVID-19 effect)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

याचे कारण हे आहे की, या दरम्यान लोक आपल्या घरांमध्ये होते, आणि जास्तीत जास्त वेळ मोबाइल Mobile, टीव्ही, लॅपटॉप आणि कम्प्युटर Computer पाहण्यात घालवत होते.

डीडब्ल्यू डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, नेदरलँड आणि चीनच्या China अलिकडच्या एका संशोधनातून समजले आहे की, कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे विशेषता मुलांमध्ये मायोपियाची myopia प्रकरणे वाढत आहेत. यास quarantine myopia म्हटले जात आहे.

120,000 पेक्षा जास्त चीनी शाळकरी मुलांच्या डेटावरून समजले की,
सहा ते आठ वर्षाच्या वयाच्या मुलांमध्ये मागील वर्षात त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत 2020 मध्ये मायोपिया होण्याची शक्यता तीनपट जास्त होती.

मायोपिया myopia काय आहे ?
मायोपिया डोळ्यांशी संबंधीत एक अशी समस्या आहे ज्यामध्ये आपल्याला दूरच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत.
सायन्सच्या भाषेत जाणून घ्यायचे तर, एखादे ऑब्जेक्ट 2 मीटर किंवा 6.6 फुटाच्या अंतरावर असेल तर ते आपल्याला धूसर म्हणजे अस्पष्ट दिसते.

एक्सपर्टचे म्हणणे आहे की, ही स्थिती मुलांसाठी भयंकर आहे.
कारण ते कमी वयात दूरच्या वस्तू पाहण्यात सक्षम नसण्याच्या स्थितीला बळी पडत आहेत.

बहुतांश प्रकरणात ही स्थिती प्राथमिक विद्यालयात सुरू होते आणि जसजसे मुल मोठे होते,
ती वाढत जाते.
जेवढ्या लवकर ती सुरू होते, तेवढ्या लवकर गंभीर होते.

जर 6 ते 10 वर्षाच्या वयादरम्यान आयबॉल जास्त वाढले तर याचा अर्थ हा आहे की, मुलाला दूरची वस्तू पाहण्यास त्रास होत आहे.
या स्थितीत डोळ्यांच्या आत उच्च दबावामुळे मोतीबिंदू, किंवा जीवनात नंतर अंधळेपणा वाढण्याचा धोका सुद्धा वाढतो.

मायोपियाची कारणे काय आहेत ?
1 या गंभीर समस्येसाठी खराब जीवनशैली एक मोठे कारण आहे.
2 असंतुलित आहारामुळे मुलांच्या शरीराला ती पोषकतत्व मिळत नाहीत, ज्यांची त्यांना गरज असते.
3 दिवसातील जास्त वेळ मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीने घेतला आहे.
अशावेळी मायोपियाला myopia वाढण्यास मदत मिळते.

मायोपिया myopia कसा ओळखावा
– रस्त्यावरील वाहतुकीची चिन्हे आणि दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहण्यास कठिण जाते.
– या दरम्यान जवळची कामे करताना जसे की, वाचन आणि कम्प्यूटरचा वापर करण्यात समस्या येत नाही.

मायोपियाची लक्षणे
1 मायोपियाच्या इतर लक्षणात स्क्विंटिंग
2 डोळ्यांचा Eyes तणाव
3 डोकेदुखीचा Headache त्रास होणे
4 वाहन चालवताना, खेळताना थकवा जाणवणे

मायोपिया myopia झाल्यानंतर काय करावे ?
जर चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा Contact Lens वापर करूनही ही लक्षणे दिसत असतील तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या.
सोबतच उपचार सुरू करा.
कारण उशीर करणे भविष्यासाठी नुकसारदायक ठरू शकते.

Wab Title : covid 19 effect myopia on the rise during lockdown what is myopia causes sign and symptoms of myopia

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार

pune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय, भूसंपादनाशिवाय दिलेली ‘वर्क ऑर्डर’ सत्ताधार्‍यांच्या अंगलट