COVID effect : संशोधनात दावा, पुरुषांच्या लैंगिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकतो कोरोना; जाणून घ्या का ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महिलांच्या तुलनेत पुरुष कोरोनाने जास्त संक्रमित होत आहेत. यापाठीमागे एक मोठे कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोनची लेव्हल कमी असणे हे आहे. या हार्मोनची लेव्हल कमी झाल्याने पुरुषांची इम्यूनिटी सिस्टम व्हायरसचा सामना योग्य प्रकारे करू शकत नाही. या हार्मोनच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येत पुरुषांचा मृत्यू होत आहे.

टेस्टोस्टेरोनचे काम काय आहे ?
टेस्टोस्टेरोन शरीराच्या बहुतांश प्रतिकारशक्ती प्रक्रियांमध्ये सहभागी असते. यामध्ये व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी बनवण्यात मदत करण्याचा सुद्धा समावेश आहे.

पुरुषांचे लैंगिक जीवन रेग्युलेट करते
टेस्टोस्टेरोन पुरुष आणि महिला दोघांमध्ये असते. परंतु हे प्रामुख्याने एक पुरुष हार्मोन आहे, कारण ते पुरुषांचे लैंगिक जीवन रेग्युलेट करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी असेल तर लैंगिक जीवनावर परिणाम होतो, प्रतिकारशक्ती व्यवस्थित काम करत नाही.

एका अभ्यासानुसार, महिलांमध्ये टेस्टोस्टेरोनची लेव्हल 60 टक्के आणि पुरुषांमध्ये 68 टक्केपेक्षा कमी असते. कारण 68 टक्केच्या दरात हे हार्मोन पुरुषांमध्ये अँटी इम्फ्लेमेटरी रिस्पॉन्स देऊ शकत नाही. मात्र, महिलांमध्ये 60 टक्के असूनही त्यांची इम्यूनिटी सिस्टम व्यवस्थित काम करते. अँटीबॉडी बनवणे सुरू करते.

कोरोनाविरूद्ध किती महत्वपूर्ण ?
संशोधनानुसार, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल सामान्यापेक्षा कमी आहे. त्यांचे कोरोनाविरूद्ध शरीर कमजोर आहे आणि त्यांचे शरीर कोरोनाशी लढण्यात इतके मजबूत नाही.