COVID-19 : जम्मू-काश्मीर मध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी, 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, संपर्कात आलेले 4 जण ‘पॉझिटिव्ह’

श्रीनगर: पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमध्ये कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे़ श्रीनगरमधील एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु झाला आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी याबाबत माहिती दिली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत ७ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. श्रीनगरमधील या ६५ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित असलेल्या स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. त्यात आणखी चार जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

You might also like