टॉयलेट सीटमुळे ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका, ‘फ्लश’ केल्याने पसरू शकतो ‘व्हायरस’, रिसर्चमध्ये खुलासा

नवी दिल्ली : आता तुम्ही जेव्हा टॉयलेटला फ्लश कराल, तेव्हा सर्वात आधी सीट कव्हर बंद करा, असे केल्याने तुम्ही कोरोना संसर्ग रोखू शकता. चीनच्या येंगझाउ विद्यापीठातील संशोधकांनी लोकांना सल्ला दिला आहे की, टॉयलेट युज केल्यानंतर फ्लश करण्यापूर्वी टॉयलेट सीट बंद करा. चीनी संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोनो व्हायरस माणसाच्या पचनतंत्रात जिवंत राहू शकतो आणि मलाद्वारे बाहेर पडू शकतो.

येंगझाउ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, टॉयलेट फ्लश केल्यावर कोरोनाचे कण हवेत जाऊ शकतात आणि संसर्ग पसरू शकतो. संशोधनात असे आढळून आले की, कोरोनाचा रूग्ण बरा झाला तरीही त्याच्या मलात व्हायरस पाच आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. फिजिक्स ऑफ फ्लुईड्स नावाच्या जनरलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

रिसर्चमध्ये म्हटले आहे की, टॉयलेट सीटमधून बाहेर पडून वातावरणात मिसळलेले कण एक मिनिटापेक्षा जास्त काळासाठी हवेत राहू शकतात. अशावेळी या हवेच्या संपर्कात आलेली व्यक्ती संक्रमित होऊ शकते.

रिसर्चमध्ये आढळले की, फ्लश केल्यानंतर पाण्याच्या वाहण्यामुळे सक्रमित कण पाण्यापासून तीन फुट उंचीपर्यंत येऊ शकतात. ज्याच्यानंतर मलातील संक्रमित कण हवेत मिसळू शकतात. जर सीट कव्हर बंद केले तर बाथरूममध्ये ते पसरण्यापासून रोखता येईल.

संशोधक जी-शियांग वँग यांनी म्हटले की, जया ठिकाणी टॉयलेट जितक्या जास्त वेळा वापरले जाते, धोका तेवढा जास्त असतो. विशेषता त्या घरांमध्ये जेथे अनेक लोक एकत्र राहतात. या समस्येवर एकच उपाय आहे तो म्हणजे सीट कव्हर बंद करणे.

जगभरात सुमारे 5 लाख मृत्यू

जगभरात कोरोना व्हायरसमुळे मरणार्‍यांची संख्या 5 लाखांच्या जवळपास पोहचली आहे. याशिवाय जगभरात आतापर्यंत 82 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार संपूर्ण जगात कोरोनामुळे 445,000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. जगभरात कोरोनाची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली आहे.

अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर या महामारीने सर्वात जास्त प्रभावीत देशांमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण जगातून कोविड-19 च्या आकड्यांचे संकलन करणार्‍या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार या आजारामुळे मरणार्‍यांच्या संख्येच्या बाबतीत भारत आठव्या स्थानावर आहे.