Video : ‘कोरोना’वर मात करून आलेल्या बहीणीचं केलं ‘या’ पध्दतीनं स्वागत, व्हिडीओ व्हायरल
पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनासोबत जगण्याची तयार ठेवत अनेकांनी कामाला जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाधा झाल्यामुळे उपचारानंतर घरी येणाार्यांचे स्वागत दिमाखात केले जाते. कोरोनावर मात करुन आलेल्या एका बहिणीचे दिमाखाात स्वागत करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्याच्या स्वामी समर्थ भागात राहणार्या एका तरुणीने कोरोनामुक्त झालेल्या आपल्या बहिणीचे गाण्याच्या तालावर नाचत स्वागत केले आहे.
सलोनी सातपूते असे त्या तरुणीचे नाव असून घरातले 5 सदस्य पॉझिटिव्ह निघाले. सलोनी एकटीच निगेटिव्ह आली. इतर सदस्यही आता बरे होत आहेत आज तिची बहीण घरी आल्यावर तिने अतिशय भन्नाट पद्धतीने तिचे गाण्यांच्या तालावर स्वागत करीत लढाऊ बाणा सिद्ध केला आहे. सलोनीने हट जा रे छोकरेहे गाणे लावून बहीणीचे स्वागत केले आहे. तर तिच्या आईने औक्षण करून तिला घरात घेतले. अनेक नेटकर्यांनी हा व्हिडीओ फेसबुक अकाउंटवर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.