Coronavirus : जगात ‘कोरोना’ व्हायरसमुळं आतापर्यंत 62 लाख लोक ‘संक्रमित’, अमेरिकेत गेल्या 24 तासात 598 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे तांडव अमेरिकेत सतत सुरूच आहे, कोविड 19 मुळे अमेरिकेत मागील 24 तासात 598 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे मरणारांची एकुण संख्या 104,356 झाली आहे. तर 1,788,762 पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त 377,714 केस समोर आल्या आहेत. केवळ न्यूयॉर्कमध्ये 29,751 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर न्यू जर्सीमध्ये 160,391 कोरोना रूग्णांपैकी 11,536 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, मॅसाचुसेट्स, इलिनॉयससुद्धा सर्वात जास्त प्रभावित आहे.

जगभरात 62 लाख लोक बाधित
संपूर्ण जगात 213 देश कोरोनाशी लढा देत आहेत. मागील 24 तासात 1 लाख 08 हजार नवे कोरोना रूग्ण समोर आले आणि मरणारांच्या संख्येत 3,191 ची वाढ झाली आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे 62 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 3 लाख 73 हजार 697 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 28 लाख 43 हजार लोक बरे सुद्धा झाले आहेत. जगातील सुमारे 73 टक्के कोरोना प्रकरणे केवळ 12 देशातील आहेत, या देशांमध्ये कोरोना पीडितांची संख्या 46 लाख आहे.

राष्ट्रीय आपत्तीची घोषणा
मृत्यू आणि पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाहता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. देशाच्या 33 करोड लोकसंख्येमधील 95 टक्केपेक्षा अधिक लोकांना घरात राहण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी सर्व संबंध संपवले आहेत. डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरसला प्रारंभीच रोखण्यात अयशस्वी ठरली आहे. संयुक्त राष्ट्र एजन्सी जागतिक महामारीचे केंद्र ठरलेल्या चीनच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी निधी बंद केला आहे.

भारतात 24 तासात विक्रमी 8,380 नव्या पॉझिटिव्ह केसेस
भारतात सुद्धा कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील 24 तासात विक्रमी 8,380 नवे पॉझिटिव्ह केस सापडल्या आहेत. तर 193 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात पीडितांची एकुण संख्या 1,82,143 झाली आहे. आतापर्यंत 5164 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 89995 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत आणि 86984 लोक बरे झाले आहेत.