COVID 19 : देशात आतापर्यंत 46711 ‘कोरोना’बधित, 13 हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात आज कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 46711 झाली आहे. यापैकी 13161 लोक बरे झाले आहेत आणि 1583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सायंकाळी साडेपाच वाजता डेटा जाहीर केला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या रिकवरी रेट सुमारे 27 टक्के आहे.

बर्‍याच ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही, यावर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड -19 वर दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम होतील.

देशात वाढत्या कोरोनाच्या घटनांबाबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी आज सांगितले की, कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे.

गुलेरिया म्हणाले की, विविध मॉडेलिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “कोविड -19 ची प्रकरणे देशात हिवाळ्यात पुन्हा एकदा वाढू शकतात, परंतू हे केवळ वेळच सांगेल.”

आपल्या राज्याची स्थिती जाणून घ्या
सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. येथे कोरोनामुळे 14541 लोकांना संसर्ग झाला असून यापैकी 583 लोक मरण पावले आहेत. 2465 रुग्ण बरे होऊन घरी परत आले आहेत.

आंध्र प्रदेशात 1717, अंदमान आणि निकोबारमध्ये 33, अरुणाचल प्रदेशात एक, आसाममध्ये 432, चंडीगडमध्ये 102, छत्तीसगडमध्ये, 58, दिल्लीत 4898, गोव्यात 7, गुजरातमध्ये 5804, हरियाणामध्ये 571, हिमाचल प्रदेश 4, जम्मू-काश्मीरमध्ये 726 कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

झारखंडमधील 115, कर्नाटकात 659, केरळमध्ये 500, लडाखमध्ये 41, मध्य प्रदेशात 3049, महाराष्ट्रात 14541, मणिपूरमध्ये 2, मेघालयात 12, मिझोरममधील एक, ओडिशामधील 170 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

पुडुचेरीतील 9, पंजाबमधील 1233, राजस्थानमध्ये 3061, तमिळनाडूमध्ये 3550, तेलंगणामध्ये 1085, त्रिपुरामध्ये 29, उत्तराखंडमधील 60, उत्तर प्रदेशात 22859 आणि पश्चिम बंगालमध्ये 1259 रुग्ण कोरोना विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत.