COVID-19 Impact : ‘कोरोना’मुळं आता फॅशन जगतात काय बदल होणार ? सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यासाचीनं सांगितलं ‘असं’ काही !

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोनामुळं फॅशन इंडस्ट्रीसह सर्व उद्योग ठप्प आहेत. फॅशन जगतासाठी हा एक झटका मानला जात आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यानं एका मुलाखतीत कोरोनाच्या संकटामुळं फॅशन दुनियेसाठी कोणत्या प्रकारची आव्हानं असतील आणि त्यात आता नेमके काय बदल येणार आहे यावर त्यानं भाष्य केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना त्यानं अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे.

सब्यासाची म्हणाला, “आयसोलेशननं आपल्या खूप काही शिकवलं. आता लोक अनावश्यक गरजा कमी करतील. आतापर्यंत लोक इंटरनॅशनल शेफ आण डेस्टिनेशन वेडिंगला जास्त महत्त्व देत होते परंतु आता त्यांचं प्राधान्य बदललं आहे.” असं त्यानं सांगितलं.

पुढे सब्यासाची म्हणतो, “लग्नासाठी आता जास्त दिखावा करण्याऐवजी आपण बजेटमध्येच सगळं काही करू शकतो. एका मोठ्या डिजे ऐवजी शहनाईवर काम चालेल. आपल्याला घाबरण्याची गरज नाही. हळूहळू आपण यातून बाहेर येऊ.”

सब्यासाची पुढे सांगतो, “माझ्याकडेही गरजेहून जास्त कपडे होते. परंतु मी त्यावर कधी लक्ष दिलं नाही. आपण सर्वांनी मिळून आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याची गरज आहे. लोकांनी बचत आणि काटकसर करायला सुरुवात केली आहे.” असंही यावेळी बोलताना मुखर्जीनं सांगितलं.