Covid-19 In India | पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, लाईफस्टाईलमध्ये ‘हे’ 5 बदलच वाचवू शकतात संसर्गापासून

नवी दिल्ली : Covid-19 In India | कोरोना व्हायरसचा कहर 2020 मध्ये सुरू झाला, ज्यापासून जगातील कोणताही देश सुटू शकलेला नाही. कोविड-१९ व्हायरसमुळे आजही लोक आरोग्याच्या अनेक समस्यांशी झगडत आहेत. या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2020 पासून आतापर्यंत कोविडचे अनेक व्हेरिएंट्स आले आहेत आणि लोकांना संक्रमित केले आहे. (Covid-19 In India)

आता पुन्हा एकदा कोविड-19 चे अनेक रुग्ण देशात वेगाने पसरत असल्याने लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे. या कठीण काळात सर्वांनी स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जीवनशैलीतील छोटे बदल कोविड-19 संसर्गापासून वाचवू शकतात. (Covid-19 In India)

1. स्वच्छता राखा

स्वच्छता राखणे सर्वात महत्वाचे आहे, जेणेकरुन कोरोना व्हायरसपासून वाचू शकता. दिवसातून अनेक वेळा हात साबणाने धुण्यास विसरू नका. घराबाहेर असाल तर सॅनिटायझर वापरा. घराबाहेरील कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करताना त्याचा वापर करा.

2. हेल्दी अन्न खा

हेल्दी अन्न खाणे ही शरीरासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जर हेल्दी अन्न खाल्ले तर त्यातील पोषकतत्व आणि व्हिटॅमिन इम्युनिटी मजबूत करतील, ज्यामुळे शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार होईल.

3. चांगली झोप घ्या

शरीराला रिकव्हरीसाठी, आरामाची आवश्यकता असते, जेणेकरून शरीराला पेशींची दुरुस्ती करता येते, विषारी पदार्थ बाहेर काढता येतात, आपल्या आठवणी आणि महत्त्वाची माहिती संग्रहित करता येते. 6 ते 9 तासांची झोप घेतल्यानंतरच हे शक्य होईल. यामुळे शरीर निरोगी राहिल आणि मनालाही आराम मिळेल.

4. अ‍ॅक्टिव्ह रहा

रोज व्यायाम करा. यामुळे तणाव, चिंता कमी होते आणि झोप सुधारते. यामुळे आरोग्यही चांगले राहते.

5. मास्क घालणे आवश्यक

सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क घाला. विशेषत: घराबाहेर जात असाल किंवा एखाद्याला भेटत असाल त्यावेळी मास्क आवश्यक आहे. आताच खबरदारी घेतली नाही तर कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढतील. जे काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.

Web Title :- Covid-19 In India | 5 lifestyle changes to stay healthy amid covid 19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

CM Eknath Shinde Threat Call | ‘मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ! पुण्यातून धमकीचा कॉल, मुंबईतील एकजण अटकेत

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट