Covid-19 In India : देशातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 91 लाखांच्या टप्प्यात, दिल्लीत 24 तासात आढळले सर्वाधिक नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोराना संक्रमितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कोरोनाची वाढणारी प्रकरणे पहाता राज्य सरकारांनी पुन्हा प्रतिबंध लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाने सर्वात जास्त दिल्ली प्रभावित झाल्याचे दिसत आहे. देशात आता कोरोना रूग्णांची संख्या 91 लाखांच्या जवळ पोहचली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाच्या 45,209 नवीन केस सापडल्या आहेत, तर 501 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दरम्यान दिल्लीत सर्वात जास्त 5879 केस समोर आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार देशात नवी प्रकरणे समोर आल्यानंतर कोरोना संक्रमित रूग्णांची एकुण संख्या 90 लाख 95 हजार 806 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 85,21,617 लोक रिकव्हर झाले आहेत. तर देशात यावेळी 4 लाख 40 हजार 962 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 33 हजार 227 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,75,326 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनाने सध्या सर्वात प्रभावित दिल्ली दिसत आहे. दिल्लीत शनिवारी कोरोना व्हायरसची 5,879 नवी प्रकरणे समोर आली आणि संसर्ग दर 12.90 टक्के राहिला. दिल्लीत मागील 24 तासात आणखी 111 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या 8,270 झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागानुसार नवीन प्रकरणे शुक्रवारी करण्यात आलेल्या 45,562 तपासण्यांमधून समोर आली. दिल्लीतमध्ये आता एकुण रूग्णांची संख्या वाढून 5,23,117 झाली आहे, ज्यापैकी 4,75,103 रूग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या 5,760 नवीन केस
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 5,760 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या शनिवारी वाढून 17,74,455 झाली. राज्याच्या आरोग्य विभागानुसार शनिवारी संसर्गामुळे 62 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 46,573 झाली आहे. राज्यात संसर्गातून मुक्त झाल्यानंतर आज 4,088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यासोबतच आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 16,47,004 झाली आहे. राज्यात सध्या 79,873 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गुजरातमध्ये एका दिवसात सर्वाधिक 1,515 कोरोना केस
गुजरातमध्ये शनिवारी कोरोना व्हायरसची एका दिवसात सर्वात जास्त 1,515 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण प्रकरणांची संख्या वाढून 1,95,917 झाली आहे. यापूर्वी राज्यात 25 सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक 1,442 प्रकरणे समोर आली होती. कोविड-19 मुळे मागील 24 तासात आणखी 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या एकुण मृतांची संख्या वाढून 3,846 झाली आहे.