COVID-19 in India : देशात 24 तासात कोरोनाच्या सापडल्या 18,711 नवीन केस, 100 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. दररोज कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकुण संख्या 1 कोटी 12 लाख 10 हजार 799 झाली आहे. मागील 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाची 18,711 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 68 हजार 520 लोक रिकव्हर झाले आहेत, तर यावेळी 1 लाख 84 हजार 523 अक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांची एकुण संख्या वाढून आता 1 लाख 57 हजार 756 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 7,37,830 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

महाराष्ट्रात लागोपाठ दुसर्‍या दिवशी 10 हजारच्यावर रूग्ण
महाराष्ट्रात शनिवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोना व्हायरस संसर्गाचे 10,000 पेक्षा जास्त नवीन रूग्ण समोर आल्याने संक्रमितांची संख्या 22,08,586 पर्यंत पोहचली आहे. आरोग्य विभागानुसार, विदर्भ, पुणे आणि मुंबईमध्ये वेगाने नवीन प्रकरणे समोर आल्याने मागील 13 दिवसात 1 लाख प्रकरणे वाढली आहेत. विभागानुसार, राज्यात 10,187 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, 47 आणि लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 52440 झाली आहे.

मुंबईत कोरोनाची 1,188 नवी प्रकरणे
मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसची 1,188 नवी प्रकरणे समोर आल्याने संक्रमितांची एकुण संख्या वाढून 3,32,208 झाली आहे. तर या महामारीमुळे पाच लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 11,500 वर पोहचली.