Covid-19 : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 32951 नवे पॉझिटिव्ह तर 391 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन : देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत कमी होत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून हे संकट संपलेले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणे नोंदल्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 97 लाखांवर पोहोचणार आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड -19 चे गेल्या 24 तासांत 32,981 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 391 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन केसेस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या वाढून 96 लाख 77 हजार 203 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत 91 लाख 39 हजार 901 लोक रिकव्हर झाले आहेत, तर सध्या 3 लाख 96 हजार 729 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या 1 लाख 40 हजार 573 झाली आहे. आयसीएमआरच्या मते, गेल्या 24 तासात देशात 8,01,081 कोरोना तपासणी झाली आहे.

कोरोना संक्रमितांंची राज्यानुसार आकडेवारी
रविवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची 4,757नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यानंतर राज्यात एकूण संसर्ग होण्याचे प्रमाण 18,52,266 इतके झाले आहे. त्याचवेळी गुजरातमध्ये संसर्गाची 1455 नवीन प्रकरणे नोंदविली गेली. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड -19 ने आणखी 40 रुग्णांचा मृृत्यूू झाला, यासह मृतांची संख्या, 47,734 वर गेली. महाराष्ट्रात आतापर्यंत 17,23,370 रुग्ण बरे झाले आहेत आणि 80,079 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर मुंबई शहरात 786 संक्रमणाची नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

गुजरातमध्ये कोरोनाची 1,514 नवीन प्रकरणे आली समोर
रविवारी, गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,514 नवीन प्रकरणे नोंदविली गेली, त्यानंतर संक्रमणाची एकूण संख्या 2,18,788 झाली. गुजरातच्या आरोग्य विभागाकडून असे सांगितले गेले होते की, कोविड -19 मुळे आणखी 17 रुग्ण मरण पावले, त्यानंतर मृतांचा आकडा 4,081 पर्यंत वाढला आहे.

बंगालमध्ये कोरोनाची 3,143 नवीन प्रकरणे
पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या आणखी 3,143 लोकांना आढळल्यानंतर रविवारी संक्रमणाचे एकूण प्रमाण 4,99,697 वर गेले. कोविड 19 साथीच्या रोगाने आणखी 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे आणि मृतांचा आकडा 8,723 झाला आहे. त्यानुसार सध्या राज्यात 23,894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूमध्ये कोविड 19 ची 1320 नवीन प्रकरणे
तामिळनाडूमध्ये रविवारी कोरोना विषाणूचे 1,320 नवीन रुग्ण आढळले, तर 16 अधिक संक्रमित मृत्यूमुखी पडले, तर कर्नाटकात कोविड -19 च्या 1,247 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर मृतांची संख्या 11,793 वर पोहोचली आहे. राज्यात 10,788 लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पंजाबमध्ये कोरोनामुळे आणखी 10 रुग्णांचा मृत्यू
रविवारी पंजाबमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 802 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1,56,226 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 4,915 वर पोहोचली आहे. पंजाब आरोग्य विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार राज्यात सध्या 7896 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.