COVID-19 in India : पहिल्यांदाच 24 तासात 3 लाखांपेक्षा जास्त रूग्ण झाले बरे, 3.92 लाख नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने आता भयंकर रूप घेतले आहे. मागील 10 दिवसापासून लागोपाठ दररोज 3 लाखापेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी या विक्रमाने 4 लाखाचा आकडा सुद्धा ओलांडला होता. मात्र, मागील 24 तासात पहिल्यांदा असे झाले आहे की, बरे झालेल्या रूग्णांचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे. शनिवारी 24 तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले. कोरोनाने शुक्रवारी थोडा दिलासा दिला आहे. देशात मागील 24 तासात 3 लाख 92 हजार 459 नवीन रूग्ण समोर आले. या दरम्यान 3,684 लोकांचा मृत्यू झाला.

यापूर्वी शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या संख्येने सर्व विक्रम तोडले होते. शुक्रवारी एका दिवसात देशात 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित सापडले. हा जगातील कोणत्याही देशातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. मागील 24 तासात संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रूग्ण सापडले, ज्यापैकी निम्मे म्हणजे 46% भारतात सापडले आहेत.

महाराष्ट्रात 63,282 नवीन प्रकरणे
देशात कोरोनाने सर्वात प्रभावित महाराष्ट्र दिसत आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोविड-19 ची 63,282 नवीन प्रकरणे समोर आली, तर महामारीमुळे आणखी 802 रूग्णांचा मृत्यू झत्तला. आरोग्य विभागानुसार राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची एकुण संख्या 46,65,472 वर पोहचली आहे, ज्यापैकी 69,615 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 62,919 नवीन प्रकरणे आली होती तर 828 लोकांचा मृत्यू झाला होता.

मुंबईत 3,897 नवीन प्रकरणे, 90 मृत्यू
राजधानी मुंबईत 3,897 नवीन प्रकरणे सापडली आणि 90 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच मुंबईत आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची संख्या वाढून 6,52,368 झाली आहे. तर 13,215 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकार्‍याने सांगितले की, मागील 24 तासात राज्यात 61,326 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच राज्यात बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 39,90,302 झाली आहे. महाराष्ट्रात यावेळी 6,63,758 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्लीत विक्रमी 25,219 केस, 412 मृत्यू
दिल्लीत शनिवारी कोरोनाची 25,219 नवीन प्रकरणे समोर आली तर सर्वाधिक 412 रूग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत संसर्ग दर 31.61 टक्के झाला आहे.