COVID-19 in India : महाराष्ट्रात कोरोनाने मोडला रेकॉर्ड ! गेल्या 24 तासात देशात 40 हजार नवे पॉझिटिव्ह, 159 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा ग्राफ दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. महाराष्ट्रात अनियंत्रित कोरोनाचे आकडे भितीदायक वाटू लागले आहेत. राज्यात मागील 24 तासात कोरोनाची 25,833 नवी प्रकरणे समारे आली आहेत, तर 58 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यानुसार, कोरोनाची नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या एक कोटी 15 लाख 14 हजार 331 झाली आहे. मागील 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाची 39,726 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 159 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 83 हजार 679 लोक बरे झाले आहेत. तर सध्या 2 लाख 71 हजार 282 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 59 हजार 370 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,57,383 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात 25,833 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात गुरुवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 25,833 नवी प्रकरणे समोर आली जी मागील वर्षी मार्चपासून रोजची सर्वात जास्त प्रकरणे आहेत. या नव्या प्रकरणांनतर राज्यात आतापर्यंत एकुण संक्रमितांची संख्या वाढून 23,96,340 झाली आहे. गुरुवारी 58 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात आतापर्यंत 53,138 लोकांचा बळी गेला आहे. रोज 24,886 प्रकरणांचा रेकॉर्ड मागील वर्षी 11 सप्टेंबरला समोर आला होता. राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट सुरु झाली आहे. या दरम्यान 12,764 रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 21,75,565 झाली आहे. राज्यात सध्या 1,66,353 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

* गुजरातमध्ये काल कोरोना व्हायरस संसर्गाची 1,276 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
* दिल्लीत गुरुवार कोरोना संसर्गाची 607 नवी प्रकरणे सापडली.