COVID-19 in India : देशात कोरानाचे ‘तांडव’ ! 24 तासात 4.1 लाख नवे पॉझिटिव्ह, ‘विक्रमी’ 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. देशात आता दररोज कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या 4 लाखाच्या पुढे जात आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 4 लाख 1 हजार 228 नवीन रूग्ण समोर आले आहेत, तर पहिल्यांदा मृतांचा आकडा 4 हजाराच्या पुढे गेला आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 4191 लोकांचा मृत्यू झाला आहे जो आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे तांडव सुरू आहे. देशात दररोज मृतांचे आकडे वाढत चालले आहेत. 25 दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या जिथे 1 हजार होती तिथे आता मृतांचा आकडा 4 हजारच्या पुढे गेला आहे. यापूर्वी 13 एप्रिलला मृतांचा आकडा 1 हजारच्या पुढे गेला होता तर 2 हजारची संख्या 20 एप्रिल आणि 3 हजारचा आकडा 27 एप्रिलला पार केला होता. मागील 10 दिवसांच्या आत कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा 4 हजारच्या सुद्धा पुढे गेला आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्थिती चिंताजनक
देशात कोरोनाने महाराष्ट्र सर्वात प्रभावित दिसत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड-19 ची 54,022 नवी प्रकरणे आल्याने एकुण संक्रमितांची संख्या वाढून 49,96,758 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, संसर्गाने 898 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74,413 लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध हॉस्पिटलमधून आणखी 37,386 रूग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने आतापर्यंत एकुण 42,65,326 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. मुंबईत संसर्गाची 3040 नवी प्रकरणे समोर आली तर आणखी 71 रूग्णांचा मृत्यू झाला. पुणे, नाशिक, कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यामध्ये चारही शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात संसर्गाची प्रकरणे जास्त आढळून येत आहेत.

मागील 24 तासातील आकडेवारी

यूपी
* नवीन प्रकरणे 28,076
* एकुण मृत्यू 372

छत्तीसगढ
* नवीन प्रकरणे 13,628
* एकुण मृत्यू 208

मध्य प्रदेश
* नवीन प्रकरणे 11708
* एकुण मृत्यू 84