COVID-19 in India : ‘अक्राळ-विक्राळ’ झाला कोरोना ! 24 तासात सापडल्या विक्रमी 4.14 लाख केस, महाराष्ट्रात पुन्हा वाढला धोका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाचा वेग पूर्णपणे अनियंत्रित झाला आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोना संक्रमितांच्या संख्येने 4 लाखांचा आकडा पार केला आहे. तर आतापर्यंत तीन वेळा असे झाले, जेव्हा कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मागील 24 तासांच्या आकड्यांवर नजर टाकली तर देशात कोरोनाची 4 लाख 14 हजार 182 प्रकरणे समोर आली आहेत, तर या दरम्यान 3,920 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी देशात कोरोनाच्या 4 लाख 12 हजार 262 पॉझिटिव्ह केस समोर आल्या होत्या, तर 3,980 लोकांचा मृत्यू झाला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर कोविड-19 ची एकुण प्रकरणे वाढून 2,14,91, 592 झाली आहेत. मागील 24 तासात कोरोनाने होणार्‍या मृत्यूनंतर देशात कोरोना महामारीने जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 2,34,088 पेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान या महामारीतून बरे होणार्‍या रूग्णांची संख्या सुद्धा वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 3 लाख 28 हजार 141 कोरोना रूग्ण बरे झाले.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा ग्राफ वर जाऊ लागला आहे. राज्यात गुरुवारी कोविड-19 ची 62,194 नवीन प्रकरणे समोर आली तर 853 रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार, नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आतापर्यंत 73,515 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमितांची एकुण संख्या 49,42,736 झाली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी कोविड-19 ची 4554 जास्त प्रकरणे समोर आली तर 67 कमी रूग्णांनी जीव गमावला.

इतर राज्यांची मागील 24 तासांतील आकडेवारी
बिहार
– नवीन प्रकरणे
– मृत्यू 90

कर्नाटक
– नवीन प्रकरणे 49,058
– मृत्यू 328

मध्य प्रदेश
– नवीन प्रकरणे 12421
– मृत्यू 86