COVID-१९ in India : कोरोनाचा वेग अनियंत्रित ! 24 तासांत 68020 नवे रूग्ण, 291 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाच्या नव्या प्रकरणांची आता झपाटयाने वाढ होत आहे. होळीच्या आधी कोरोनाने नवीन प्रकरणात भर घालून देशाची चिंता वाढविली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोविड-१९ ची ६८,०२० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर २९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात एकूण बाधितांची संख्या १ कोटी २० लाख ३९ हजार ६४४ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मतानुसार, देशात आता १ कोटी १३ लाख ५५ हजार ९९३ लोक रिकव्हर झाले आहेत. तर आता ५ लाख २१ हजार ८०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या मृतांची संख्या वाढून आता १ लाख ६१ हजार ८४३ झाली आहे. ICMR च्या मतानुसार, देशात गेल्या २४ तासांत ९,१३,३१९ लोकांची कोरोना तपासणी केली गेली आहे.

महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणू संसर्गाची ४०,४१४ नवीन प्रकरणे आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या २७,१३,८७५ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात २५ मार्चला कोरोना केसेस २६ लाखांवर पोहचले आहेत. विभाग म्हणाले, कोविड-१९ मुळे आणखी १०८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५४,१८१ वर पोहचली आहे. मुंबईमध्ये रविवारी एका दिवसात सर्वात जास्त ६,९३३ नवीन केसेस समोर आल्यानंतर एकूण संख्या ३,९८,७२४ झाली आहे.

दिल्लीने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडले, १८०० पेक्षा अधिक रुग्णांची भर
रविवारी दिल्लीत कोरोना विषाणूंचे १८०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. जे गेल्या साडेतीन महिन्यांपेक्षा एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आहेत. यावेळी ९ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने म्हंटले आहे की राष्ट्रीय राजधानीत संक्रमणाची ऐकून संख्या ६,५७,७१५ वर पोहचली आहे. तर ११,००६ लोक व्हायरसमुळे मरण पावले आहेत. विभागाने म्हंटले आहे की ६.३९ लोक संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. शहरात शनिवारी १५५८, शुक्रवारी १५३४, गुरुवारी १५१५, बुधवारी १२५४ आणि मंगळवारी ११०१ प्रकरणांची नोंद झाली आहे.

आंध्र प्रदेशात १००५ नवीन प्रकरणांची नोंद
रविवारी आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १००५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. २६ नोव्हेंबरपासून दररोज नोंदवलेल्या घटनांमध्ये ही सर्वाधिक नोंद आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार नवीन प्रकरणे आल्यानंतर राज्यात एकूण संख्या ८,९८,८१५ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या कोविड-१९ मधील रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला. बुलेटीननुसार आतापर्यंत राज्यात ८,९८,२१६ रुग्ण बरे झाले असून ७,२०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.