Covid-19 in Maharashtra | राज्य मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव ! मंत्री शंभूराज देसाईंना कोरोनाची लागन, महाराष्ट्रातील रूग्णसंख्येतही वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Covid-19 in Maharashtra | राज्यभरातील कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आता राज्य मंत्रिमंडळात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंना कोरोनाची लागण झाली आहे (Shambhuraj Desai Tested Covid 19 possitve). कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरूवात केल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Covid-19 in Maharashtra)

शंभूराज देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट करून आणि ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोरोना बाधित झाले आहेत. देसाई म्हणतात, मी माझ्या घरीच गृह विलगीकरणात तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या 3-4 दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना लक्षणे आढळल्यास तात्काळ कोविड टेस्ट करून घ्यावी. (Covid-19 in Maharashtra)

राज्यात ऑक्टोबर 2022 नंतर पहिल्यांदास 2 हजाराहून अधिक अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 450 नवे रूग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मुंबईत 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईत कोरोनाचे 43 रूग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत (Covid 19 In Mumbai). त्यापैकी 21 रूग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन वेळावेळी करण्यात आले आहे.

Web Title :- Covid-19 in Maharashtra | Maharashtra Cabinet infected with coronavirus ! Minister Shambhu Raj Desai infected with coronavirus, the number of patients in Maharashtra also increased

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू