Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 428 नवे पॉझिटिव्ह तर 23 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारला यश येताना दिसत आहे. दिवसेंदिवस व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन देखील दिवस-रात्र प्रयत्नशील आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनोच 428 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं शहरातील 23 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 8 जणांचा आज शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं तब्बल 4045 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 759 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 58 हजार 378 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 46 हजार 94 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 8 हजार 248 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 750 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 412 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करावा असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.