Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12689 नवे पॉझिटिव्ह तर 137 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात जसजशी कोविड-19 लसीकरणा (Covid 19 vaccination) ची गती वाढत चालली आहे, तसतसे कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या नवीन प्रकरणांमध्येही घट होत आहे. बुधवारी देशात गेल्या 24 तासांत 12,689 प्रकरणे नोंदली गेली, तर 137 लोक मरण पावले. यासह आतापर्यंत देशात एकूण कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत बघितले तर ही संख्या वाढून आता 1,06,89,527 झाली आहे. आतापर्यंत, भारतात कोरोनामुळे एकूण 1,53,724 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 13,689 लोक कोरोना विषाणूला मात देऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 1.03 कोटी लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याच वेळी, भारतात सध्या कोरोना विषाणूची एकूण 1,76,498 सक्रिय प्रकरणे आहेत.

त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार 26 जानेवारीपर्यंत भारतात 19,36,13,120 कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. केवळ मंगळवारीच 5,50,426 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यासह कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात लसीकरणही वेगाने सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत देशात 20 लाखाहून अधिक कोरोना वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले आहे.

भारत आता जगातील त्या पहिल्या 15 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, जिथे कोरोनामुळे दररोज सर्वाधिक मृत्यू होत आहेत. गेल्या 13 दिवसांपासून देशात 200 पेक्षा कमी मृत्यू होत आहेत. आता या बाबतीत जगात भारताचा क्रमांक 16 ते 20 च्या दरम्यान आहे.