‘Covid-19 Insurance’ घेतल्यावर सरकारकडून मिळेल 5 टक्क्यांची ‘सवलत’, 50000 ते 5 लाखांपर्यंतचे मिळणार विमा ‘कवच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक आयआरडीएने (IRDA) 29 सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना कोविड -19 उपचारासाठी शॉर्ट टर्म कोरोना कवच हेल्थ विमा पॉलिसी आणण्याची परवानगी दिली आहे. देशात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना विमा कंपन्यांना ही सूचना मिळाली आहे. यासह, आयआरडीएने विमा कंपन्यांना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना कवच प्रीमियमवर 5% सवलत देण्यास सांगितले आहे. नियामकानुसार, प्रीमियम पेमेंट एकदाच करावे लागेल आणि प्रीमियमची रक्कम संपूर्ण देशात समान असेल. आयआरडीएने असेही म्हटले आहे की काही अहवालात रुग्णालयाद्वारा रूग्णांची विमा पॉलिसी असूनही कोविड -19 च्या उपचारासाठी ‘कॅशलेस सुविधा’ दिली जात नसल्याचे म्हटले आहे. नियामक म्हणाले की रुग्णालये कॅशलेस सुविधा नाकारू शकत नाहीत.

50 हजार ते 5 लाखांचे मिळणार विमा संरक्षण
28 जून रोजी आयआरडीएचे अध्यक्ष एस.सी. खुंटिया यांनी विमा कंपन्यांना 10 जुलै पर्यंत कोरोना कवच पॉलिसी सुरू करण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार साडेतीन महिन्यांपासून ते साडे नऊ महिन्यांच्या कालावधीपर्यंतच्या विम्यामध्ये 50 हजार ते 5 लाख पर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. 31 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी 2.5 लाख रुपयांच्या पॉलिसीचा प्रीमियम 2,200 रुपये आहे. याच वयातील दोन प्रौढ आणि दोन मुलांसाठी प्रीमियम 4,700 रुपये आहे. म्हणजेच एकत्र कुटुंबाचा विमा काढण्यासाठी प्रीमियम स्वस्त असेल.

या कंपन्यांना मिळाली परवानगी
आयआरडीएने कोरोना कवच विमा पॉलिसी आणण्यास परवानगी दिलेल्या 29 सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांपैकी ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, एसबीआय जनरल विमा, आयसीआयसीआय लोम्बार्ड, एचडीएफसी एर्गो, मॅक्स बुपा, बजाज अ‍ॅलियान्झ, भारती एक्सा आणि टाटा एआयजी या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांचा समावेश आहे. आयआरडीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्पावधीसाठी पॉलिसी साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिने असू शकते. यामध्ये विम्याची रक्कम 50,000 ते पाच लाखांपर्यंत आहे.