COVID-19 : सलग चौथ्यांदा ‘कोरोना’ टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कनिका कपूरचे कुटुंबीय ‘ चिंतेत’

पोलीसनामा ऑनलाईन :सिंगर कनिका कपूरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कनिकाच्या प्रकृतीत विशेष असा फरक दिसत नाहिये. नुकतीच कनिकाची चौथी कोरोना व्हायरस टेस्ट झाली. यावेळी ती सलग चौथ्यांदा पॉझिटीव आढळली आहे. यानंतर तिचे कुटुंबीय आता चिंतेच्या छायेत आहेत.

कनिकाचे कुटुंबीय चिंतीत

कनिका कपूरची चौथी कोरोना टेस्ट पॉझिटीव आल्यानंतर आता तिचे कुटुंबीय परेशान झाल्याचं दिसत आहे. त्यांनी कनिकाच्या प्रकृतीबद्दल पीजीओ हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे चिंता व्यक्त केली आहे. तिची देखभाल करण्यासाठी एक नर्स नेमली आहे. प्रत्येक चार तासातून त्या नर्सची शिफ्ट बदलते. एका दिवसात 6 नर्स ड्युटी करताना दिसत आहेत. या नर्सेस तिला औषधही देतात आणि इतर गोष्टींचीही काळजी घेतात. कनिकाचा डाएट आणि तिच्या रुमच्या स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जात आहे.

कनिका कपूर पॉझिटीव आढळ्यानंतर सध्या आयसोलेशनमध्ये आहे. 20 मार्च 2020 पासून कनिकावर उपचार सुरू आहेत. अलीकडेच कनिकानं तिच्या इंस्टावरून एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. तिनं एक फोटो शेअर केली आहे ज्यात घड्याळ दिसत आहे आणि काहीतरी मजकूरही लिहलेला आहे. यावर लिहिलं आहे की, “आयुष्य आपल्याला वेळेचा सदुपोयग करायलं शिकवतं. तीच वेळ आपल्याला जीवनाची कदर करायला शिकवतं.” मुलांची आठवण येत असल्याचंही तिनं सांगितलं आहे.