COVID-19 : ‘या’ कारणामुळं ‘कोरोना’विरोधातील युद्धात डोनेशन देऊनही ‘करीना-सैफ अली खान’ ट्रोल !


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूरनं मंगळवारीच या विषयीची माहिती दिली आहे की, तिनं आणि तिचा पती सैफ अली खान यांनी देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईसाठी डोनेशन देऊन आपलं योगदान दिलं आहे. करीना आणि सैफनं युनिसेफ, GIVE INDIA आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज(IAHV) अशा संस्थांना COVID-19 सोबत निपटण्यासाठी डोनेशन दिलं आहे. परंतु सोशल मीडिया मात्र त्यांच्या या निर्णयानं जास्त खुश नाहीये असं दिसत आहे.

काही लोक यामुळं नाराज झाले आहेत की, तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी केअर्स फंडात डोनेट करण्याऐवजी ग्लोबल एजन्सीजला डोनेशन दिलं. अनेक सोशल मीडिया युजर्स त्यांच्या कामावर टीका करताना दिसत आहेत. सैफ आणि करीना पीएम केअर्स फंडात डोनेशन न दिल्यानं ट्रोल होताना दिसत आहेत. काही लोकांनी त्यांचं समर्थनही केलं आहे. त्यांनी जे डोनेशन दिलं आहे त्यासाठी काहंनी त्यांचं कौतुकही केलं आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून पोस्ट शेअर करत दिलेल्या डोनेशनची माहिती दिली होती. तिनं लिहिलं होतं की, “अशा कठिण काळात एकीनं राहण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. आम्ही दोघांनीही यासाठी एक पाऊल टाकलं आहे. आम्ही युनिसेफ, GIVE INDIA आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज(IAHV) या संस्थांना आपलं समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. माझा आग्रहे ज्यांना असं करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच इतरांना मदत करा. जय हिंद. करीना, सैफ आणि तैमूर.”

https://www.instagram.com/p/Bz2jCmvAR8s/

https://www.instagram.com/p/B-PCrxqp0aV/