Coronavirus : 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या ‘लठ्ठ’ पुरूषांचे कोरोनामुळं जास्त मृत्यू, स्टडीमधील खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू लठ्ठ लोकांना खूप घातक ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की कोरोना विषाणूमुळे 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लठ्ठ स्त्रियांच्या तुलनेत लठ्ठ पुरुषांचा मृत्यू अधिक होत आहेत. याचा अर्थ असा आहे की अधिक चरबी असलेल्या लोकांना याचा जास्त धोका आहे, तसेच जर ते जास्त वयस्कर असतील तर कोरोनापासून बचाव करणे फार महत्वाचे आहे.

कैसर परमेन्टे दक्षिण कॅलिफोर्निया आरोग्य प्रणाली (Kaiser Permanente Southern California Health System) च्या संशोधकांनी कोरोनाच्या 7000 प्रकरणांचा अभ्यास केला आहे. त्यांना आढळले की जर इतर सर्व रोग आणि परिस्थिती दूर केल्या तर लठ्ठपणा हे एकमेव कारण आहे ज्यामुळे 60 वर्षांहून कमी असलेल्या पुरुषांचे मृत्यू अधिक होत आहेत. अभ्यासामध्ये असे म्हटले गेले आहे की जास्त लठ्ठ लोकांच्या शरीराचा बीएमआय (Body Mass Index) 40 पॉईंट्सपेक्षा जास्त असेल तर कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता तीन पटीने वाढते. जर तो 45 पेक्षा जास्त असेल तर मृत्यूची शक्यता चार पट जास्त असते. दोन्ही प्रकरणांमध्ये पुरुषांची स्थिती खूपच वाईट आहे. तथापि, यातून महिला तुलनेने वाचल्या आहेत.

याआधीही हा प्रश्न उपस्थित झाला होता की कोरोना विषाणूमुळे लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या लोकांना जास्त नुकसान होते काय? म्हणून हे माहित असले पाहिजे की युरोपच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, युरोपमध्ये जितके लोक आजारी पडले आहेत त्या लोकांपैकी दोन तृतीयांश लोक लठ्ठ आहेत. एनएचएसच्या मते, जर आपल्या शरीरावर जादा चरबी असेल तर आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असेल. त्यामुळे आपल्यासाठी कोरोना विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. एनएचएसने असेही म्हटले आहे की गंभीरपणे आजारी असलेल्या लोकांपैकी 40 टक्के लोक 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि लठ्ठ आहेत. विशेष म्हणजे केवळ युनायटेड किंगडममध्येच कोरोना संक्रमित रूग्णांपैकी 63 टक्के लोक आयसीयूमध्ये आहेत. ते सर्व चरबीयुक्त किंवा उच्च बीएमआय असणारे आहेत.

मार्च महिन्यात एका वेळी सुमारे 194 लोक आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट होत होते. यापैकी जवळजवळ 130 लोकांचे वजन जास्त होते. एका वेळी आयसीयूमध्ये दाखल झालेल्या 194 लोकांपैकी 139 रूग्ण पुरुष असायचे म्हणजेच सुमारे 71 टक्के. तर 57 महिला भरती होत होत्या म्हणजेच 29 टक्के. यापैकी 18 रुग्ण असे असायचे ज्यांना फुफ्फुस किंवा हृदयासंबंधी आजार होते. म्हणजेच लठ्ठपणामुळे होणारे आजार इ.

याआधी देखील असे बरेच अभ्यास केले गेले आहेत ज्यात असे सांगितले गेले होते की लठ्ठ लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तसेच त्यांना फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांचे देखील असे म्हणणे आहे की लठ्ठ लोकांच्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता पाहिजे तेवढी चांगली नसते जेवढी बारीक किंवा तंदुरुस्त लोकांची असते. कारण हे लोक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले अन्न खात नाहीत. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे शरीराच्या डायाफ्रॉम आणि फुफ्फुसांमध्ये समस्या निर्माण होतात. म्हणजेच अशा लोकांना पूर्ण श्वास घेणे कठीण जाते. चरबीयुक्त लोकांना लवकर धाप लागते. म्हणून त्यांच्या शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजनची पुरेशी मात्रा पोहोचत नाही.