COVID-19 : ‘या’ 5 पध्दतीनं केली जाते ‘कोरोना’ व्हायरसची ‘टेस्ट’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसबाबत भीतीचे वातावरण असून या व्हायरसने लाखो लोकं संक्रमित झाली आहेत. तसेच व्हायरस वेगाने वाढत असून भारतात कोरोना व्हायरसबाबत अनके अहवाल समोर आले आहेत. थोडीशी सर्दी-ताप झाल्यावर आपण विचार करतो कि आपल्याला कोरोना झाला आहे. इथपर्यंत कि लोकं तपासणीसाठी रुग्णालयातही जातात, पण भीतीमुळे तपासणी करण्या अगोदरच पळून जातात.

तुमच्या मनात कोरोना व्हायरसबाबत भीती असणे साहजिक आहे, पण यापासून पळून जाणे म्हणजे त्याचा उपाय नाही. तर या व्हायरसबाबत तुम्हाला सावधान राहिले पाहिजे, ज्याने आपल्या कुटुंबासह शेजाऱ्यांचाही जीव वाचवू शकतो. जर तुम्हालाही कोरोना व्हायरसची लक्षणे दिसत असतील, तर या चाचण्या करून सहजपणे ओळखू शकता.

कोरोना व्हायरसच्या चाचणीचे नाव काय आहे?
कोरोना व्हायरस COVID-19 ओळखण्यासाठी कोणतीही विशेष चाचणी नाही, तर याला रुग्णालयात ५ चाचण्या करून ओळखू शकता. जर तुम्हाला कोरोना व्हायरस असेल तर होतील या ५ चाचण्या…

ए स्वाब टेस्ट
या चाचणीत एक स्पेशल कॉटनने गळा आणि नाकातून सॅम्पल घेतले जाते.

ए अनुनासिक एस्पिरेट
या चाचणीत नाकात एक सलाईन टाकले जाते आणि नंतर आरामात नमुना घेतला जातो.

ए श्वसननलिका एस्पिरेट
‘ब्रोन्कोस्कोप’ नावाची एक बारीक, हलकी ट्यूब तुमच्या फुफ्फुसात टाकली जाते. जिथून तुमचे सॅम्पल एकत्र केले जाते.

श्लेष चाचणी
थुंकी हा आपल्या फुफ्फुसातील श्लेष्माचा एक प्रकार आहे. ज्याचा नमुना घेतला जातो.

रक्त चाचणी
या चाचणीसह तुमची रक्त चाचणीही घेतली जाते. ज्यमुळे कोरोना व्हायरसबाबत माहिती केली जाते.

कोरोना व्हायरसची चाचणी येण्यास किती वेळ लागतो?
कोरोना व्हायरस टेस्ट दिल्यांनतर ३ दिवस परिणाम कळण्यास लागतात.