Covid-19 : ट्राफिकशी संबंधित आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे, ‘या’ 7 नियमांचे करा पालन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी पोलिस आणि वाहतूक पोलिस रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. सामाजिक अंतर, मास्कपासून जवळपास प्रत्येक गोष्टीची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. सरकारद्वारे जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि लॉकडाऊनचे पालन करण्यापासून ते कोरोना तपासणीसंदर्भात लोकांना जागरूक करत आहे. ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची आणि वाहतूक पोलिसांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. सरकारची अधिकृत वेबसाईट IndiaFightsCorona च्या ट्विटर हँडलवर ही 7 मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पोलिसांना इतर व्यक्तींपासून अंतर ठेवण्यासह अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना टाळण्यासाठी या सात नियमांचे करा अनुसरण –

1. इतर लोकांपासून कमीतकमी 1 मीटर अंतर ठेवा.
2 . हातांच्या स्वच्छतेचे अनुसरण करा, चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा.
3. आपण तपासत असलेल्या कागदपत्रांना स्पर्श करू नका.
4. लोकांना स्वतःपासून विशिष्ट अंतरावर थांबवा.
5. नेहमीच फेस मास्क घाला आणि सुरक्षितपणे विल्हेवाट लावा, हँड सॅनिटायझर वापरा.
6 . रुग्णालयांच्या क्वारंटाईन सुविधांजवळ तैनात असल्यास पीपीई किट घाला.
7. कर्तव्यानंतर, घरी गेल्यावर वापरलेले कपडे स्वच्छ धुवा.

देशात कोरोना संक्रमितांचे वाढते प्रमाण

भारतात कोविड – 19 च्या नवीन प्रकरणांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 75,760 नवीन रुग्णांची संख्या समोर आली असून ही आतापर्यंतची रेकॉर्ड संख्या आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज कोरोनाची 55 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे येत आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना रूग्णांची संख्या 33 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये सुमारे आठ लाख सक्रिय प्रकरणे आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात 1,023 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 60,472 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर 24 लाख लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.